कनाशी येथे १३२/३३ के व्ही उपकेंद्र अडकले लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 14:54 IST2020-06-25T14:54:00+5:302020-06-25T14:54:52+5:30
कळवण :कनाशी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्र मंजुर असून कोट्यवधी रु पयांचा भरणा महापारेषणने जमिनीपोटी महसूल विभागाकडे केला आहे. मात्र ...

कनाशी येथे १३२/३३ के व्ही उपकेंद्र अडकले लालफितीत
कळवण :कनाशी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्र मंजुर असून कोट्यवधी रु पयांचा भरणा महापारेषणने जमिनीपोटी महसूल विभागाकडे केला आहे. मात्र ६ वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे कळवण तालुक्यातील आदिवासी व शेतकरी बांधवाना सुरळीत व नियमित योग्य दाबाने वीज मिळत नसल्याची तक्र ार आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीआहे.
या तक्र ारीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ महापारेषणचे सचिव व कार्यकारी संचालक यांच्याशी संवाद साधून उपकेंद्र कार्यन्वित करण्याचे लेखी आदेश दिले.
तत्कालीन आघाडी सरकारच्या कालावधीत तत्कालीन ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी तत्कालीन आमदार स्व. ए. टी. पवार यांच्या मागणीनुसार कनाशी येथे उपकेंद्र २०१४ मध्ये मंजुर केले. मात्र गेल्या ६ वर्षात कुठलीही कार्यवाही झाली नाही. कनाशीचा प्रस्ताव लालफित अडकून पडल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीबाबत आमदार पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विनंती निवेदनाद्वारे केली.
एप्रिल २०१४ मध्ये कनाशी उपकेंद्राला मंजुरी दिल्यानंतर महापारेषण विभागाने महसूल विभागाकडे कनाशी येथील जागेपोटी १कोटी १७ लाख रु पयांचा भरणा केला आहे.गेल्या ६ वर्षापासून कनाशी उपकेंद्र सुरु करण्याबाबत वारंवार मागणी करून देखील शासनस्तरावर सदर विषय प्रलंबित आहे. बोरगाव ह्या उपकेंद्रांना १३२ के व्ही दिंडोरी उपकेंद्रातून वीज पुरवठा जोडण्यात आला आहे .३३ के व्ही वाहिनीचे अंतर ८० कि.मी असल्याने सुरगाणा येथे कमी दाबाने वीज पुरवठा होतो.कनाशी येथे उपकेंद्र कार्यान्वित झाल्यास कळवण तालुक्यातील दळवट व कनाशी भागात आणि सुरगाणा तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होईल .