शहरात एकाच दिवसात १३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 01:04 IST2020-08-03T01:02:21+5:302020-08-03T01:04:06+5:30

नाशिक शहरात रविवारी एकाच दिवसात एकूण ४८८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३ बळींची नोंद झाली आहे.

13 victims in a single day in the city | शहरात एकाच दिवसात १३ बळी

शहरात एकाच दिवसात १३ बळी

नाशिक : शहरात रविवारी एकाच दिवसात एकूण ४८८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३ बळींची नोंद झाली आहे. शहरातील १३ बळींमध्ये बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा सामवेश असून, एका ज्येष्ठ महिलेचादेखील अंतर्भाव आहे. त्यामुळे शहरातील एकूण बळींची संख्या आता २९५ वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरात आढळलेल्या ४८८ बाधितांमुळे शहरातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या १० हजार २९६ वर पोहोचली आहे. मात्र, त्यापैकी ७,५८६ बाधित पूर्णपणे बरे झाले असल्याने एकूण बाधितांची संख्या २,४१५ आहे.

Web Title: 13 victims in a single day in the city