शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

हरणगाव धरणात बुडून 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 11:02 IST

हरणगाव जवळ असलेल्या धरणात अंघोळीसाठी उतरलेल्या पाच मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाचपैकी एका 12 वर्षीय मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देहरणगाव जवळ असलेल्या धरणात अंघोळीसाठी उतरलेल्या पाच मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाचपैकी एका 12 वर्षीय मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मुलींना बुडताना पाहून जवळच असलेल्या 3 लहान मुलांना चार मुलींना वाचवण्यात यश आलं.

पेठ (नाशिक) - हरणगाव जवळ असलेल्या धरणात अंघोळीसाठी उतरलेल्या पाच मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. पाचपैकी एका 12 वर्षीय मुलीचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे. मुलींना बुडताना पाहून जवळच असलेल्या 3 लहान मुलांना चार मुलींना वाचवण्यात यश आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, आसरबारी येथील जयश्री कमलाकर भुसारे, साक्षी कमलाकर भुसारे (14), ज्योती तुकाराम जाधव (12), अर्चना तुकाराम जाधव (16) व दीक्षा तुकाराम जाधव (11) या पाच मुली हरणगाव येथील धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुऊन वाळत टाकल्यानंतर पोहण्याची इच्छा झाल्याने पाचही मुलींनी धरणात उडी मारली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यापैकी साक्षी भूसारे व ज्योती जाधव बुडू लागल्या. मुलींचा आरडा ओरडा ऐकून परिसरातच असलेल्या 3 मुलांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता या मुलींना पाण्याबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साक्षीला वाचवण्यात मुलांना यश आले. मात्र ज्योती तुकाराम जाधव ही पाण्याखाली गेल्याने वाचवणे कठीण झाले. 

घटनेची माहिती मिळताच हरणगाव, आसरबारी सह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोध कार्य सुरू केले. सायंकाळपर्यंत प्रयत्न करून रात्री आठच्या सुमारास ज्योतीचा मृतदेह हाती लागला.याबाबत पोलीस पाटील गेणुदास जाधव यांनी पेठ पोलिसांना दिलेल्या खबरीवरून पोलीस पथकाने पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांना पाचारण केले. ज्योती जाधव या  मुलीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. याबाबत पेठ पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

तिघांनी केले शर्थीचे प्रयत्न

धरणात मुली बुडत असल्याचे लक्षात येताच याच परिसरात असलेले देवानंद मुरलीधर गायकवाड, हर्षद रघूनाथ जाधव व पंडीत रोहीदास गायकवाड या 10-12 वर्षीय मुलांनी  धरणाकडे धाव घेऊन जीवाची पर्वा न करता पाण्यात सुर मारला. एका मुलीला वाचवत पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले मात्र ज्योती जाधव हिचा दुर्देवी मृत्यू झाला. सदरची घटना समजल्यावर आसरबारी गावावर शोककळा पसरली यापैकी साक्षी व जयश्री या दोन्ही दिंडोरी तालुक्यातील सादराळे गावच्या असून सुटीनिमित आसरबारी येथे मामाच्या गावी आल्या होत्या. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेNashikनाशिकDeathमृत्यू