मटका खेळणारे ११ जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:08 IST2019-03-19T23:03:33+5:302019-03-20T01:08:36+5:30
जेलरोड कॅनॉलरोड येथे मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून ११ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

मटका खेळणारे ११ जण ताब्यात
नाशिकरोड : जेलरोड कॅनॉलरोड येथे मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून ११ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जेलरोड कॅनॉलरोड स्वागत सोसायटीच्या मागे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी छापा मारून बबन सयाजी पगारे याच्यासह ११ जणांना मटका जुगार खेळतांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड, असा ऐवज जप्त केला आहे.
गळफास घेऊन मुलीची आत्महत्या
नाशिकरोड : श्री घंटी म्हसोबा मंदिरामागील डावखरवाडी येथे १५ वर्षांच्या मुलीने राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. डावखरवाडी येथील गणेशशायन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या तनिष्का अदितोष धोंगडे (१५) या मुलीने राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काठेगल्ली सिग्नलवर नियमांचे उल्लंघन
नाशिक : काठेगल्ली सिग्नलवर वाहनधारकांकडून नेहमीच नियमांचे उल्लंघन केले जाते. या ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त असतानाही वाहनधारक सर्रास नियम मोडीत असल्याचे दिसते. विशेषत: द्वारकेकडून नाशिकरोडकडे जाणारी वाहने उल्लंघन करताना दिसतात.