शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०४ मिमी पावसाची नोंद

By admin | Updated: October 15, 2016 00:28 IST

जिल्ह्यात १०४ मिमी पावसाची नोंद

घननिळा बरसला : विभागात नगरला सर्वाधिक पाऊस; धुळे जिल्ह्यात कमी पाऊसंमनोज मालपाणी ल्ल नाशिकरोडदुष्काळग्रस्त महाराष्ट्रावर वरुणराजाची कृपा झाली आणि उत्तर महाराष्ट्रात धो - धो पाऊस बरसला. पाण्याची टंचाई असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला, तर त्या खालोखाल नाशिकमध्ये पाऊस पडला.पाण्यामुळे निर्माण झालेला दुष्काळ आणि त्यामुळे राजकीय वातावरणही ढवळून निघाल्यानंतर न्यायालयापर्यंत पाण्याचे प्रकरण पोहचले. पाण्याचे आवर्तन आणि पाणी राखीव ठेवण्याच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर अनेक वाद-प्रतिवाद झाले, जर यंदा पाऊस बरसलाच नाही तर काय होणार, अशी चिंता सर्वत्र लागलेली असताना उत्तर महाराष्ट्रावर पावसाची कृपा झाली. यावर्षी सर्वाधिक पाऊस नगर जिल्ह्यात आतापर्यंत (१४६.७ मि.मी.) व या खालोखाल नाशिक जिल्ह्यात (१०४.५ मि.मी.) पडला आहे. विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३५ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. आतापर्यंत अपेक्षेपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात सोमवार (दि.३) सायंकाळपर्यंत १०६५.८ मि.मी. (१०४.५ टक्के), धुळे - ४८४.५ मि.मी. (९०.७ टक्के), नंदुरबार - ७१८.५ मि.मी. (८५.६ टक्के), जळगाव - ६६७.७ मि.मी. (१००.१ टक्के), अहमदनगर - ६४९ मि.मी. (१४६.७ टक्के) पाऊस पडला आहे. वार्षिक सरासरीनुसार नाशिक - ९९.१ टक्का, धुळे - ८५.६ टक्के, नंदुरबार - ८२ टक्के, जळगाव - ९५.१ टक्के, अहमदनगर - १३०.५ टक्के पाऊस पडला आहे.तालुक्यात पडलेला पाऊसनाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३५ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे, तर ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत - १५ तालुके ५१ ते ७५ टक्क्यांपर्यंत तीन तालुक्यांत पाऊस पडला आहे, तर २६ ते ५० टक्क्यांदरम्यान एकमेव धुळे तालुक्यात पाऊस झाला आहे. धुळे तालुका - ५६० मि.मी., शिंदखेडा- ५१२, शिरपूर- ६४९, साक्री- ४१५ असा एकूण धुळे जिल्ह्यात सरासरी २१३६ मि.मी. पाऊस पडला आहे.नंदुरबार - ६४८ मि.मी., शहादा- ६९०, अक्रानी - ७६६, अक्कलकुवा- १०३२, तळोदा- ७७६, नवापूर - ११२७ असा एकूण नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ८४० मि.मी. पाऊस पडला आहे. जळगाव - ६९१ मि.मी., जामनेर - ७२६, एरंडोल - ६२७, धरणगाव - ६२७, भुसावळ - ६७३, बोदवड - ६७३, यावल - ७०१, रावेर - ६७२, मुक्ताईनगर - ६३०, अमळनेर - ५८६, चोपडा - ६९४, पारोळा - ६२०, पाचोरा - ७४८, चाळीसगाव - ६६५, भडगाव - ६७४ असा एकूण जळगाव जिल्ह्यात सरासरी ६६७ मि.मी. पाऊस पडला आहे, तर अकोला - ४४२ मि.मी., संगमनेर - ३६६, कोपरगाव - ३८९, श्रीरामपूर - ४२०, राहुरी - ४२५, नेवासा - ४७५, राहता - ३८९, शेवगाव - ५१५, पाथर्डी - ४९६, श्रीगोंदा - ३७९, कर्जत - ४४३, जामखेड - ५७३, पारनेर - ४१६, अहमदनगर - ४६६ असा एकूण अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ४४२ मि.मी. पाऊस पडला आहे. यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.