लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धवळीविहिर, ता.तळोदानजीक घडली. करमसिंग दोहरा वळवी (30) रा.माळखुर्द, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे. दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या. त्यात करमसिंग वळवी यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय दिलवर वळवी, रा.बेडापाडा, ता.तळोदा व आणखी एकजण जखमी झाले. तळोदा पोलिसात मोटार अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}