'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:28 IST2025-08-11T13:24:53+5:302025-08-11T13:28:37+5:30
नंदुरबारमध्ये लहान भावाने धारदार वस्तूने भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल
Nandurbar Crime: नंदुरबारमध्ये दोन वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेल्यानंतर तिचा झगडा मिटविण्यासाठी येत नसल्याच्या रागातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला. ९ ऑगस्ट रोजी तेलखेडी शिपाणपाडा ता. धडगाव येथे ही घटना घडली. पुन्या बागडा पावरा (४१) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पुन्या पावरा याचा लहान भाऊ कोटा याची पत्नी दोन वर्षापूर्वी त्याला सोडून निघून गेली होती. यामुळे कोटा हा पुन्या पावरा यांना निंबापूर ता. चोपडा जि. जळगाव याठिकाणी बोलावत होता. पत्नी सोडून गेल्यानंतर तिचा झगडा अर्थात काडीमोडची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोटा सातत्याने मोठ्या भावाला बोलावत होता. परंतू पुन्या हा टाळाटाळ करत होता. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी कोटा हा तेलखेडी शिपाणापाडा येथे आला होता. दरम्यान ९ ऑगस्ट रोजी कोटा हा तेलखेडी शिपाणापाडा येथे आला होता. याठिकाणी येऊन त्याने भावासोबत वाद घातला होता. या वादादरम्यान लोखंडी टिकाव उचलून पुन्या याने कोटा याच्या डोक्यात वार करून त्याला ठार केले. याप्रकरणी तेंगा बागडा पावरा यांनी धडगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कोटा बागडा पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधी मारहाण केली नंतर गळा दाबून केला खून
आणखी एका प्रकरणात पतीने पत्नीला मारहाण करुन खून केल्याचा प्रकार घडला. पतीच्या अवैध संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता काळटोमी ता. नंदुरबार याठिकाणी घडली. विटाबाई रामा गांगुर्डे (५०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी संतोष रामा गांगुर्डे याने नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रामा उत्तम गांगुर्डे (५४) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विटाबाई यांचा पती रामा गांगुर्डे याचा पर स्त्री सोबत संबंध असल्याचे उघड झाले होते. पतीचे बाहेर अवैध संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पत्नी विटाबाई यांनी त्याला विरोध करत जाब विचारला होता. याचा राग आल्याने आठ ऑगस्ट रोजी दुपारी रामा उत्तम गांगुर्डे याने पत्नी विटाबाई यांना मारहाण करून गळा दाबून खून केला. हा प्रकार समोर आल्यानंतर संतोष गांगुर्डे याने पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी भेट माहिती घेतली.