शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

शाश्वत स्वच्छतेवर नंदुरबारात कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:29 AM

नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह येथे सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छाग्रही यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. फडोळ बोलत होत्या. त्या ...

नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह येथे सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छाग्रही यांच्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. फडोळ बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शाश्वत स्वच्छता राहावी यासाठी नंदुरबार तालुक्यात फिनिश सोसायटी मार्फत ५१ ग्रामपंचायतीअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामुळे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी संधी निर्माण झाली असून या संधीचे सोने करावे. गावे स्वच्छतेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करून गावाचा लौकिक वाढवावा. यात आपली भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. फडोळ यांनी केले.

स्वच्छ भारत मिशन ,ग्रामीण पंचायत समिती ,नंदुरबार, एन.एस.ई . फाऊंडेशनअंतर्गत फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छाग्रही यांच्यासाठी हागणदारीमुक्तीवर आधारित प्रशिक्षकांचे पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, फिनिश सोसायटीचे प्रकल्प संचालक अभिषेक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आले आहे.

प्रशिक्षणाचे उद्घाटन उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, मुख्य प्रशिक्षक शिवकुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभ, एन. डी. पाटील, प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, अभिजित मैंदाड, निशांक गजभिये आदी उपस्थित होते

प्रास्ताविक मंगेश निकम यांनी केले. पाच दिवसीय या प्रशिक्षणात स्वच्छतेसाठी वर्तणूक बदलाची आवश्यकता का आहे, शौचालयाची नियमित देखभाल व दुरुस्ती, घनकचरा व सांडपाणी यांचे व्यवस्थापन, अस्वच्छता यामुळे होणारे विविध आजार, शाश्वत स्वच्छतेसाठी उपलब्ध असलेले विविध तांत्रिक पर्याय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच शाश्वत स्वच्छता कशी राखावी, यासाठी क्षेत्रभेटीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.