शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी अभियंत्यांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST

तालुका पातळीवर प्राप्त घरकुलाच्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांचे कामाचे टप्पेनिहाय मानधन मिळत असते. त्यामध्ये लाभार्थीचे घरकूल मंजूर झाल्यावर लेआउट देणे, जिओ ...

तालुका पातळीवर प्राप्त घरकुलाच्या उद्दिष्टानुसार लाभार्थ्यांचे कामाचे टप्पेनिहाय मानधन मिळत असते. त्यामध्ये लाभार्थीचे घरकूल मंजूर झाल्यावर लेआउट देणे, जिओ टॅगिंग करणे, लाभार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, टप्पे निहाय हप्ते वितरित करण्यापूर्वी प्रत्येक पातळीचे फोटो मोबाईल आवास ॲपमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून काढणे, वेळोवेळी लाभार्थ्यांना गृहभेटी व इतर आवश्यक कार्यालयीन कामे हे ग्रामीण अभियंते करीत आहेत. सध्या राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्या कालावधीमध्ये शासन स्तरावरून १९ नोव्हेंबर २०२० पासून ५ जून २०२१ पर्यंत महाआवास अभियान ग्रामीण भागात राबविण्यात आले आहे. या अभियान काळामध्ये २०१६-१७ ते २०२०-२१ पर्यंत सर्व योजनांची घरकुले अभियान कालावधीमध्ये १०० टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून लाभार्थ्यांना वारंवार प्रत्यक्ष भेटी देण्यात आलेल्या असून, त्याकरिता लागणारा प्रवास भत्तादेखील अद्याप या अभियंत्यांना मिळाला नाही. पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. जून २०२० ते मार्च २०२१ पर्यंतचे एकूण १० महिन्याचे मानधन त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे परिवाराचा उदरनिर्वाह करणे मुश्कील झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये मानधन देण्यात यावे, अन्यथा बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

मानधनासाठी निधीच उपलब्ध नाही

शहादा तालुक्यात बांधकाम विभाग (घरकूल), पंचायत समिती शहादामध्ये २४ ग्रामीण अभियंते सध्या कार्यरत आहेत. ग्रामीण अभियंत्यांच्या या आंदोलनामुळे घरकूल लाभार्थ्यांचे हप्ते मिळण्यास विलंब होईल व लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी होईल, अशी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने त्यांच्या मानधनासाठी पंचायत समिती स्तरावर निधीच उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती आहे.