शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कलसाडी ते मालकातर रस्त्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:48 IST

बंधाऱ्यापासून आलेल्या पाटचारीच्या मधोमध केले जात असल्याने या पाटचारी आपले अस्तित्व गमावून बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात ...

बंधाऱ्यापासून आलेल्या पाटचारीच्या मधोमध केले जात असल्याने या पाटचारी आपले अस्तित्व गमावून बसण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात डोंगरगाव रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठते अक्षरशः हा संपूर्ण रस्ता जलमय होऊन पूरस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते. हा शहादेकरांचा नेहमीचा अनुभव आहे. कवळीथ बंधाऱ्यातील पाटचाऱ्यांचे नियमितपणे खोलीकरण होत नसल्याने पावसाळ्यात शहादेकरांना हा त्रास सोसावा लागतो, अशा परिस्थितीत या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारामार्फत पाटचाऱ्यांच्या मधोमध गटारींची निर्मिती करण्यात येत असल्याने भविष्यात पावसाळ्यात भयावह परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला या पाटचाऱ्या असून, त्याची जागा सोडल्यानंतर त्या भागात गटारी करणे आवश्यक आहे. मात्र ठेकेदाराने या संपूर्ण प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याने थेट शहादा शहर ते डोंगरगाव व गोगापूर फाट्यापर्यंत सुमारे १५ किलोमीटरची पाटचारी ठेकेदारामार्फत बुजवली गेली आहे

या रस्त्याचे काम करताना शहादा नगरपालिका पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग या तिघा विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. मात्र पाटचाऱ्यांच्या मधोमध गटारीचे काम होत असताना पाटबंधारे विभागाने याची चौकशी केलेली नाही किंवा हरकत ही घेतलेली नाही तर दर पावसाळ्यात या ठिकाणी संपूर्ण परिसर जलमय होत असताना शहादा पालिका प्रशासनाने या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असताना ठेकेदाराला असे का करतो असा जाबही विचारला नाही. परिणामी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कवळीथ बंधाऱ्यापासून आलेले पाटचारी भविष्यात आपोआप अस्तित्व गमावणार असल्याची वेळ निर्माण झाली आहे व याचा मोठा त्रास शहादेकरांना सोसावा लागणार असून, ज्या पद्धतीने गटारीची निर्मिती करण्यात येत आहे. त्या गटारींमधून पावसाळ्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सहजरीत्या वाहून जाणार नसल्याने भविष्यात या ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण होणार आहे. यासाठी या तिन्ही विभागाने एकत्रित पणे बैठक घेऊन पुढील निर्णय घेणे अपेक्षित आहे.

डोंगरगाव चौफुलीपासून पुढे मालकातर गावापर्यंत काही ठिकाणी या रस्त्याचे काम एका बाजूने तर काही ठिकाणी दोन्ही बाजूने पूर्ण झालेले आहे. डांबरीकरणाचा थर टाकण्यात आलेला आहे. मात्र रस्ता निर्माण करताना रस्त्या खालील मातीचे योग्य ते परीक्षण केले गेले नसल्याने रस्ता निर्माण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे तर डांबरीकरण उखडून निघाले आहे. यावरून कामाचा दर्जा किती उत्कृष्ट आहे हे स्पष्ट होते. ठेकेदारामार्फत खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याला पॅचेस मारण्यात आले आहे, ठिगळं जोडण्यात आलेले आहे. मात्र यावरून हा रस्ता हस्तांतरित झाल्यानंतर भविष्यात खरोखरच या पुढील १० वर्षांच्या काळासाठी योग्य दर्जाचा राहील यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहादा पालिका प्रशासन पाटबंधारे विभाग व बांधकाम विभाग यांचे एकत्रितपणे या रस्त्याची संपूर्ण तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना आजच करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात शहादेकरांना पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार असल्याची शक्‍यता जाणकारांमार्फत वर्तविली जात आहे.