‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबधातून

By Admin | Updated: April 20, 2017 16:00 IST2017-04-20T16:00:59+5:302017-04-20T16:00:59+5:30

भवरे, ता.नवापूर येथील महिलेचा खून अनैतिक संबधातून झाल्याचे उघड झाले आहे.

'That' woman's murder from immoral relationships | ‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबधातून

‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबधातून

नवापूर,दि.20 - भवरे, ता.नवापूर येथील महिलेचा खून अनैतिक संबधातून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

शिवाजी बाबाजी गावीत (47) रा.पानबारा व योहान जत्र्या गावीत (37) रा.भवरे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भवरे येथील शेतात चा:याच्या गंजीत एका (40) वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिच्या पोटावर आणि गळ्यावर वार करण्यात आले होते. महिलेची ओळख पटवून पोलिसांनी तपासाला गती दिली. महिलेचे पानबारा येथील शिवाजी बाबाजी गावीत या व्यक्तीशी अनैतिक संबध असल्याची बाब समोर आल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाची कबुली देत त्याला सहाय्य करणा:या योहान गावीत रा.भवरे याचे नाव सांगितले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोडडी देण्यात आली आहे. 

Web Title: 'That' woman's murder from immoral relationships