शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात अहवाल देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महिनाभराच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असले तरी येत्या महिनाभरात विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणूक महिनाभराच्या आत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे असले तरी येत्या महिनाभरात विविध सण, उत्सवांची रेलचेल राहणार असल्यामुळे अशा काळात निवडणुका आणि सण-उत्सव यांचा बंदोबस्त अशी दुहेरी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यादृष्टीने अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुद्दा सद्या ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनावणीनंतर दिलेल्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोग आणि नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांमध्ये निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिका:यांशी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून एकुण तयारीसंदर्भात आढावा घेतला. त्यात निवडणुका आणि सण-उत्सवांच्या काळातील बंदोबस्त याची सांगड कशी घातली जाणार याबाबत मुद्दा अडला आहे. त्याबाबतचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिका:यांना देण्यात आल्या आहेत. हिंदू धर्मात श्रावण महिन्यापासून विविध सण-उत्सवांची रेलचेल सुरू होते. थेट दिवाळीर्पयत ती कायम राहते. स्थानिक स्तरावरील दशा माता उत्सव, श्रीकृष्ण अष्टमी, दहीहंडी उत्सव, पोळा, गणेशोत्सव असे विविध सण या काळात येतील. यावेळी दिवाळीच्या काळातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याच्या आधीच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका  जाहीर झाल्यास कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून जिल्हा प्रशासनाला दुहेरी कसरत होणे क्रमप्राप्त आहे. यादृष्टीने जिल्हा प्रशासनाची एकुणच तयारी आहे किंवा कशी याची चाचपणी करून तातडीने अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर आयोग निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. मतदार यादी तयारजिल्हा प्रशासनाने यापूर्वीच मतदार यादी तयार केली आहे. त्यामुळे मतदार यादी जाहीर करणे,हरकती मागविणे व मतदार यादी अंतिम करणे या बाबींमधील वेळ वाचणार आहे. त्यामुळे ही एक बाब तयारीच्या दृष्टीने सुलभ राहणार आहे.गट, गण रचनाही तयारजिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाची रचना यापूर्वीच   अंतिम करण्यात आलेली आहे. गट, गण रचनांवरील हरकती आणि त्या अंतिम करण्याची सर्व प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाने पुर्ण करून ठेवली आहे. आरक्षणही जाहीरगट, गणांचे आरक्षणही यापूर्वीच जाहीर करून ते राजपत्रात प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे या पातळीवरील तयारीही पुर्ण आहे. त्याचा अहवालही यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे.मतदान केंद्रांची स्थितीमतदान केंद्रांच्या स्थितीबाबत राज्य निवडणूक आयोगाने माहिती मागविली आहे. परंतु सद्य स्थितीत ग्रामिण भागातील मतदान केंद्रांचीही तयारी अद्ययावत राहील अशी स्थिती आहे. कारण दोनच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान केंद्र अद्ययावत करण्यात आलेली होती. त्यामुळे या मतदान केंद्रांची यादी जिल्हा प्रशासनाकडे तयार आहेच. एकुणच जिल्हा परिषद निवडणुकीची अधिसुचना कधीही जाहीर होईल अशी स्थिती प्रशासन स्तरावर आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या अधिका:यांनी मंगळवारी जिल्हाधिका:यांशी व्हिडीओ  कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून एकुणच जिल्हा परिषद निवडणुकविषयीची तयारी यासंदर्भात जाणून घेतले. जिल्हाधिका:यांनी मतदार यादी, गट, गण रचना, आरक्षण आदी तयारी यापूर्वीच पूर्ण असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचा:यांची पुरेशी     संख्या देखील उपलब्ध असल्याचे सांगितले. फक्त मतदान केंद्र आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील    अहवाल दोन दिवसात सादर करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यामुळे येत्या दोन दिवसात निवडणुकीची अधिसुचना जाहीर होण्याची शक्यता आहे.