शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला वाचता येत नसल्याने पेटवून देत केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्नपत्रिकेवर तारीख वाचता येत नसल्याच्या रागातून वाकीपाडा येथील एकाने पत्नीला पेटवून देत खून केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्नपत्रिकेवर तारीख वाचता येत नसल्याच्या रागातून वाकीपाडा येथील एकाने पत्नीला पेटवून देत खून केला होता़ २०१८ मध्ये घडलेल्या घटनेत नंदुरबार सत्र व जिल्हा न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे़फेब्रुवारी २०१८ मध्ये वाकीपाडा ता़ नवापुर येथील यूसूफ फारुख सोनगडीया याने पत्नी शबाना हिला नातेवाईकाकडून आलेली लग्नपत्रिका वाचण्यास दिली होती़ यावेळी पत्नीला लग्नाची तारीख सांगता आली नाही़ यातून त्याने पत्नी शबाना हिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती़ दरम्यान पत्नीला हाकलूनही दिले होती़ परंतू शबाना ही प्रतिकार करत घरात परतली़ याचा राग येवून युसूफ याने शबाना हिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते़ यानंतर पिडित महिलेने बाथरुममध्ये जावून स्वत:ची आग विझवत दवाखाना गाठला होता़ याठिकाणी उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता़ याप्रकरणी नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर यूसूफ सोनगडीया याच्याविरोधात सहायक पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी दोषारोपत्र दाखल केले होते़ नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष भागवत यांच्या कोर्टात हा खटला सुरु होता़ आरोपी यूसूफ यास जन्मठेपेची शिक्षा न्यायमूर्ती भागवत यांनी सुनावली़ सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ सुशील पंडीत यांनी काम पाहिले़ पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक नितीन साबळे व गिरीष पाटील यांनी काम पाहिले़