शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोणी लस घेता का लस..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:13 IST

नंदुरबार : राज्यातील विविध भागांत कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असताना, जिल्ह्यात मात्र एक लाखांपेक्षा अधिक डोस नागरिकांना देण्यात आले ...

नंदुरबार : राज्यातील विविध भागांत कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा असताना, जिल्ह्यात मात्र एक लाखांपेक्षा अधिक डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. एकीकडे लसीकरणासाठी ४५ केंद्रे नियुक्त असताना, या केंद्रांवर नागरिकांनी यावे, यासाठी आरोग्य विभाग इतर विभागांच्या मदतीने लसीकरण मोहीम राबवत नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करत आहे.

जानेवारीच्या मध्यापासून सुरू झालेल्या लसीकरणात नंदुरबार जिल्ह्याने नेहमीच आघाडी कायम ठेवली आहे. यातून आरोग्य कर्मचारी व हेल्थकेअर वर्कर यांना आतापर्यंत २८ हजार ९१७ लसींचा प्रथम डोस, तर १४ हजार २१२ लसींचा दुसरा डोस पूर्ण करण्यात आला आहे. एकूण ६२ टक्के आरोग्य व फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. हे सुरू असताना, ४५ वर्षांवरील ७४ हजार ८७० जणांना प्रथम, तर ३४ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाची गती ही कायम असताना, आरोग्य विभागाकडून नुकतेच २५ हजार डोसेस प्राप्त झाले होते. यातून १८ वर्षांवरील युवकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातून आतापर्यंत २ हजार ३७८ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आहे. लस घेण्यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर गर्दी नसली,तरी शिक्षण विभागाने आदेशित केलेल्या शिक्षकांकडून होत असलेल्या जनजागृतीमुळे ग्रामीण भागातील नागरिक केंद्रांवर येत आहेत. तरीही काही ठिकाणी अपेक्षित टारगेट पूर्ण होत नसल्याने नागरिकांची मनधरणी करावी लागत आहे.

नुकतीच लस घेतली. लस घेतल्याचे समाधान आहे. ही लस आरोग्यदायी आहे. नागरिकांनी लस घेतली पाहिजे. त्यातून कोरोनाचा धोका कमी होणार आहे. नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.

- आदित्य वळवी

वय १९, नंदुरबार.,

६० वर्षे गटात उत्साह

नंदुरबार जिल्ह्यात ज्येष्ठांमध्ये लसीकरणाचा उत्साह आहे. यातून आतापर्यंत या वयोगटात ७५ हजार डोसेस दिले गेल्याचे दिसून आले आहे. यामुळे लवकरच एक लाखाचा आकडा पार होण्याची शक्यता आहे.

४५ वयोगट उदासीन

जिल्ह्यातील ४५ वर्षे वयोगटातील ४० हजार नागरिकांनी आतापर्यंत लस घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा पहिला डोस आहे. दुसरा डोस घेणारे मात्र अद्याप वाढलेले नाहीत. लवकरच ही संख्याही वाढणार आहे.

युवकांचा उत्साह

युवकांसाठी लसीकरण सुरू होऊन आठवडाही उलटलेला नाही. यात लसींचा तुटवडा दोन दिवस होता. परंतु तूर्तास लस उपलब्ध असल्याने २ हजारपेक्षा अधिकजणांनी नोंदणी करून पहिला डोस घेतला.

आरोग्य विभागाकडून योग्य पद्धतीने लसीकरण सुरू आहे. लसीकरण वाढावे, यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा गावोगावी लसीचे महत्त्व पटवून देत आहेत. यातून जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट्य पूर्ण होणार आहे.

-डाॅ. एन. डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.