शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला डॉक्टर व्हायचे पण शिकविणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गणोर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीच्या इंग्रजी विषयाचे शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील गणोर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीच्या इंग्रजी विषयाचे शिक्षक शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे आम्हाला डॉक्टर-इंजिनिअर व्हायचे पण इंग्रजी शिकवणार कोण? असा सवाल विद्यार्थ्यांनी नंदुरबार येथील प्रकल्प कार्यालयात अधिकाऱ्यांपुढे उपस्थित केला.शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गणोर येथील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार येथील आदिवासी विकास प्रकल्प गाठून समस्यांचा पाढा वाचला. शैक्षणिकदृष्ट्या इंग्रजी विषय हा महत्त्वाचा असून विषय शिक्षक असून ते शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन पुढील भविष्यही धोक्यात आले आहे. हा प्रकार शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गणोर येथे मागील शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून सुरू आहे. नववी व दहावीच्या इंग्रजी विषयाचे विषय शिक्षक मुख्याध्यापक एम.जी. पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु ते इंग्रजी विषय शिकवत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले व पालकांनी झालेल्या ग्रामसभेत हा सर्व प्रकार सांगितल्यावर संबंधित विषय शिक्षकाचे पितळ उघडे पडले. सरपंच, शिक्षण व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत नंदुरबार प्रकल्प कार्यालय गाठला व आपली समस्या मांडली.दहावीच्या विद्यार्थ्यांची येत्या मार्च महिन्यात परीक्षा सुरू होणा आहे. मात्र आजपर्यंत संबंधित शिक्षकाने विद्यार्थ्यांना काहीही शिकवलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेत काज लिहीतील? असा संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आदिवासी विकास विभागाने संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.दरम्यान, आम्हाला इंग्रजी विषय शिकायला मिळाला नाही. परंतु येणाºया नवीन दहावीच्या विद्यार्थ्यांना तरी तो शिकविला जावा, अशी अपेक्षाही या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.