कुठल्या बाईशी बोलत बसले होते?; पत्नीने प्रश्न विचारल्यानंतर तिला पतीने पाजले सॅनिटायझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 15:25 IST2021-08-27T15:25:10+5:302021-08-27T15:25:25+5:30

कुठल्या बाईशी बोलत बसले होेते? म्हणून विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

Which lady do you talk to ?; After the wife asked the question, her husband gave her sanitizer | कुठल्या बाईशी बोलत बसले होते?; पत्नीने प्रश्न विचारल्यानंतर तिला पतीने पाजले सॅनिटायझर

कुठल्या बाईशी बोलत बसले होते?; पत्नीने प्रश्न विचारल्यानंतर तिला पतीने पाजले सॅनिटायझर

नंदुरबार : कुठल्या बाईशी बोलत बसले होते? म्हणून विचारणा करणाऱ्या पत्नीस पतीने सॅनिटायझर पाजून बेदम मारहाण केल्याची घटना शहादा येथे २४ ऑगस्टला रोजी घडली. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पती विशाल ईश्वर भावसार याच्याविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल नेहमी मोबाईलवर बोलत असतात, म्हणून पती-पत्नीत खटके उडत होते. कुठल्या बाईशी बोलत बसले होेते? म्हणून विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात विशाल यांनी प्रणाली यांना सॅनिटायझर पाजले.

Web Title: Which lady do you talk to ?; After the wife asked the question, her husband gave her sanitizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.