कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST2021-05-30T04:24:40+5:302021-05-30T04:24:40+5:30

नंदुरबार : कोरोना लसीचा पहिला डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा व दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा लसीचा अर्थात कॉकटेल लस घेण्यासंदर्भात ...

What if Corona made a cocktail of vaccines? | कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?

कोरोना लसीचे कॉकटेल केले तर?

नंदुरबार : कोरोना लसीचा पहिला डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा व दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा लसीचा अर्थात कॉकटेल लस घेण्यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळी मते आहेत. काहींच्या दृष्टीने यात काहीच वावगे नाही तर काहींनी वेगवेगळ्या कंपनीच्या लसींमधील प्रतीजैविके आणि इतर बाबी वेगवेगळ्या असल्यामुळे कॉकटेल घेणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

कोरोना लसीचे कोविशिल्ड व कोवॅक्सिन हे दोन प्रकार सद्या उपलब्ध आहेत. लवकरच स्पूतनिक ही लस उपलब्ध होणार आहे. लस घेतांना पहिला व दुसरा डोस वेगवेगळ्या लसींचा घेतला तर काय होऊ शकते याबाबत मात्र वैैद्यकीय क्षेत्रात एकमत नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने मात्र तसे केल्यास काहीही वावगे नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. असे असले तरी नंदुरबार जिल्ह्याची स्थिती पाहता पहिला डोस ज्या लसीचा घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोस देण्यावर भर आहे. त्यामुळे जिल्ह्यात तरी कॉकटेलचा असा प्रकार शक्य झालेला नाही. परंतु येणाऱ्या काळात लसींची उपलब्धता कशी राहील त्यावर कॉकटेलचा प्रकार अवलंबून राहणार असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: What if Corona made a cocktail of vaccines?