शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविषयक माहिती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे संकेतस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

या संकेतस्थळावर खासगी आणि सरकारी रुग्णालयातील रिकाम्या खाटांची माहिती उपलब्ध होणार आहे. तालुकानिहाय आणि रुग्णालयनिहाय ही माहिती उपलब्ध करून ...

या संकेतस्थळावर खासगी आणि सरकारी रुग्णालयातील रिकाम्या खाटांची माहिती उपलब्ध होणार आहे. तालुकानिहाय आणि रुग्णालयनिहाय ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याने नागरिकांना अधिक सोयीचे होणार आहे. तालुक्याचे नाव किंवा रुग्णालयाचे नाव टाकून खाटांची उपलब्धता तपासण्याची शोधप्रणालीदेखील संकेतस्थळावर आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर नागरिकांना आपला अहवाल कळावा, यासाठी संकेतस्थळाचा उपयोग करता येणार आहे. आपला मोबाईल क्रमांक दिल्यास कोरोना चाचणीची तात्काळ माहिती मिळू शकेल. जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिकांची स्थिती (लोकेशन) आणि मोबाईल क्रमांकदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. नागरिकांना लसीकरण करणे सोयीचे व्हावे यासाठी लसीकरण केंद्राची माहितीदेखील संकेतस्थळावर उपलब्ध असेल. शासन आणि प्रशासनाकडील कोविड-१९ संदर्भातील सर्व आदेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांमध्ये समन्वय स्थापण्यासाठी आणि नागरिकांना माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला असून ०२५६४-२१०१२३/२१०२३४/२१०२३५/२१०००६ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेता येणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांनी घरी न थांबता रुग्णालय अथवा प्रशासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या अलगीकरण कक्षात उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.