शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले संविधान आणि आम्ही’ या विषयावर वेबिनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

शहादा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शहादा येथे रा.से.यो.व विद्यार्थी विकास विभाग, क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव आणि ...

शहादा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शहादा येथे रा.से.यो.व विद्यार्थी विकास विभाग, क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव आणि श.ता.कॉ.ऑप.एज्यु. सोसायटी संचलित विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपले संविधान आणि आम्ही’ या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारचे प्रक्षेपण युट्यूबवर करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये कॉन्स्टिट्युशन ॲण्ड रिस्पॉन्सीबल सीटीजनशीप इनीशिएटीव्स या संस्थेच्या संस्थापिका आणि मुख्य समन्वयिका भक्ती भावे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी भारतीय संविधानाच्या जडणघडणीवर प्रकाशझोत टाकला. या चर्चेदरम्यान त्यांनी संविधान म्हणजे काय? तसेच संविधानाची उद्देशिका व त्यासंदर्भातील नागरिकांची कर्तव्ये यासंदर्भात खूप सोप्या शब्दात मार्गदर्शन केले. संविधानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि त्याचा वापर याची त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.

कृषी सभापती, जि.प.नंदुरबार व श.ता.को.ऑप.एज्यु. संस्थेचे संचालक अभिजित मोतीलाल पाटील यांनीही उद्घाटनपर मार्गदर्शन केले. रा.से.यो.व विद्यार्थी विकास विभागाचे (क.ब.चौ.उ.म.वि. जळगाव) संचालक डॉ. पंकज नन्नवरे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी कोविड महामारीच्या काळातील महाविद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका त्यांच्या प्रास्ताविकामध्ये मांडली. या कार्यक्रमामध्ये जवळपास ५० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या कार्यक्रमामध्ये रा.से.यो. जिल्हा समन्वयक (नंदुरबार) डॉ. माधव कदम, विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक (नंदुरबार) डॉ. एस. बी. पाटील , धडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील, आय.एम.आर.डी. चे संचालक अनिल पाटील यांनी सहभाग नोंदविला.

रा.से.यो. जिल्हा समन्वयक (नंदुरबार) डॉ. माधव कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. उल्हास सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी रा.से.यो. विभागाच्या कार्यक्रम अधिकारी सोनाली पाटील आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.