शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात समाधानाची लहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

मैदाने गजबजली नंदुरबार : शहरातील विविध भागांतील मैदाने सकाळी आणि सायंकाळी गजबजत आहेत. नागरिक फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी मैदानांचा आधार ...

मैदाने गजबजली

नंदुरबार : शहरातील विविध भागांतील मैदाने सकाळी आणि सायंकाळी गजबजत आहेत. नागरिक फिरण्याचा व्यायाम करण्यासाठी मैदानांचा आधार घेत आहेत. यात अनेक जण संपूर्ण कुटुंबासह व्यायाम करत असल्याचेही दिसून येत आहे. पहाटे सहा व सायंकाळी सहापासून मैदाने गजबजत आहेत.

जिल्हा बँकेच्या फिरत्या एटीएममुळे दिलासा

नंदुरबार : जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना ५८ कोटी रुपयांचे कर्ज वाटप यंदा केले आहे. तात्पुरत्या स्वरूपातील रुपे कार्डच्या माध्यमातून हे कर्ज वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, कर्ज प्राप्त झाल्यानंतर एटीएम गरजेचे असल्याने जिल्हा बँकेने फिरते एटीएम सुविधा सुरू केली आहे. हे एटीएम त्या-त्या शाखांच्या खाली थांबत असल्याने शेतकऱ्यांना पैसे काढण्यात येणारे अडथळे कमी झाले आहेत.

विक्रेते ग्रामीण भागात

नंदुरबार : लाॅकडाऊन शहरे बंद आहेत. यातून रस्त्यांवर विविध वस्तू विक्री करणारे दुचाकीने ग्रामीण भागाकडे जात आहेत. यातून काही अंशी वस्तूंची विक्री होऊन रोजगार कमावता येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या फिरस्तीतून बऱ्यापैकी पैसे मिळत असल्याचे सांगण्यात आले.

सर्वेक्षणाला गती

शहादा : तालुक्यातील गावांमध्ये माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेसाठी गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आशासेविका, अंगणवाडीसेविका, ग्रामसेवक, तलाठी आदी गावात फिरून सर्वेक्षण पूर्ण करत आहेत.

कोथिंबिरीची आवक वाढली

नंदुरबार : तालुक्यातील विविध भागातून बुधवारी बाजारपेठेत काेथंबिरीची मोठी आवक झाली होती. १० रुपयांत तीन जुड्या विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली होती. सोबतच पालक, मेथी व पोकळा यांचीही आवक झाल्याचे दिसून आले. बाजारात मंगळवारी भाजीपाला विक्रेत्यांपेक्षा शेतकरीच अधिक दिसून येत होते. स्वस्त अशा त्यांच्या भाजीपाल्याची खरेदी नागरिकांकडून केली गेली.

आमचूरला भाव कमी

धडगाव : आमचूर हंगामाची सांगता येण्याची वेळ येऊनही दर वाढत नसल्याने, आदिवासी बांधव अडचणीत आहेत. दरदिवशी कमी दराने आमचूरची खरेदी होत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरांबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका घेत कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

बेशिस्ती कायमच

अक्कलकुवा : शहरातील बाजारपेठेत फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर टाळण्याचे प्रकार कायम आहेत. पोलीस प्रशासनाकडून कारवाई होऊनही योग्य ती शिस्त लागत नसल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात दररोज सकाळी सात वाजेपासून गर्दी उसळत आहे.

मंदाणे येथे सुविध द्या

मंदाणे : शहादा तालुक्यातील मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी भरती व इतर सुविधा देण्याची मागणी आहे. या ठिकाणी रिक्त पदांची संख्या मोठी आहे. याबाबत पाठपुरावा करूनही कार्यवाही झालेली नाही. यामुळे रुग्णसेवेवर ताण पडत आहे.

सीमावर्ती भागात चिंता

मंदाणे : शहादा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेलगतच्या गावांमध्ये सध्या चिंतेची स्थिती आहे. मध्य प्रदेशात कोरोनास्थिती गंभीर होत आहे. यातून मध्य प्रदेशातील रुग्ण उपचारांसाठी तालुक्याच्या ग्रामीण भागात डाॅक्टरांकडे येत असल्याचे दिसून येत आहे.