शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यातील पाणवठे कोरडेठाक; वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

सातपुड्यातील हजारो हेक्टरमध्ये जंगल असून, या जंगल परिसरात मांसभक्षी, तृणभक्षी, विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात लांडगा, बिबट, ...

सातपुड्यातील हजारो हेक्टरमध्ये जंगल असून, या जंगल परिसरात मांसभक्षी, तृणभक्षी, विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात लांडगा, बिबट, कोल्हा, काळवीट, हरीण, मोर, खोकड, सायाळ, रानडुक्कर, तरस आदी प्राणी गावच्या बाजूला पाण्याच्या शोधात येत असल्याचे चित्र आहे, तसेच दुर्मीळ किंगफिशर व घार हे पक्षीही या जंगलात आढळतात.

सध्या मार्चच्या तप्त उष्णतेमुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यातील पाणी आटायला लागल्याचे दिसून येत आहे, तसेच यंदाच्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सतत वाढणारे तापमान पाहता हे नैसर्गिक पाणवठे तग धरू शकतील का, याविषयी शंका आहे. वन विभागाने या जंगल परिसरात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत; परंतु या पाणवठ्याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले असून, ते अद्यापपर्यंत कोरडेठाक आहेत. वाढणाऱ्या तापमानामुळे वन्य प्राण्यांची पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.

पाणवठे कोरडेठाक असल्याने वन्य प्राण्यांची गाव वस्तीकडे धाव

उन्हाळा सुरू होताच अतिदुर्गम भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच वन्य प्राण्यांनादेखील पाणवठे कोरडेठाक होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकंती करून गाव वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे. यावेळी वन्य प्राणी गाववस्तीकडे धाव घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, संबंधित वन विभागाने जंगलातील पाणवठे पुनर्जिवित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वन्य प्राण्यांसाठी तोरणमाळ रस्त्यालगत पाणवठे तयार करण्यात आले होते; परंतु वन्य प्राणी रस्त्यालगत असलेल्या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येत असताना अपघातदेखील घडत होते. यासाठी हे पाणवठे कोरडे ठेवण्यात आले असून, वनतळे तयार करण्यात आले आहे. - एस.के खुणे, वनक्षेत्रपाल, राणीपूर.