शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

जयनगर : शहादा तालुक्यात दोन आठवड्यांहून जास्त कालावधी उलटला तरी दोन-चार गावे वगळता संपूर्ण तालुक्यात अजूनही पाऊस न ...

जयनगर : शहादा तालुक्यात दोन आठवड्यांहून जास्त कालावधी उलटला तरी दोन-चार गावे वगळता संपूर्ण तालुक्यात अजूनही पाऊस न झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेची भर पडली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे अशीच परिस्थिती असताना शहादा तालुक्यात हा प्रश्‍न अधिक गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावले आहे. काही ठिकाणी तर अजून पेरणीलासुद्धा सुरुवात झालेली नाही.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शहादा तालुक्यात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी केली होती. नंतर १० ते १२ दिवस होऊनही पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे व लागवडीचे संकट ओढवले होते. दुबार पेरणी व लागवड झाल्यावर आता पुन्हा दोन आठवड्यांचा कालावधी उलटून पाऊस न आल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र जून महिन्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे, तर जुलै महिन्यात आजच्या दिवशी दोन-तीन ठिकाणे वगळता इतर गावांमध्ये एकही पाऊस झालेला नाही. त्यामुळे सुरुवातीला पेरणीची कामे आटोपलेल्या शेतकऱ्यांवर पाऊस नसल्यामुळे आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर काही शेतकऱ्यांनी अगोदरच दुबार पेरणी व लागवड केली असून, त्यांच्यावर तिबार पेरणी व लागवडीचे संकट ओढवले आहे.

शहादा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवसांत सर्वत्र पाऊस न झाल्यास६ दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहे. बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकचा आधार असल्याने ते पिके तग धरून आहेत. मात्र त्यांची वाढ खुंटली आहे. तर कोरडवाहू क्षेत्रातील पिके पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असून, ती पावसाअभावी करपू लागली आहेत. दोनदा महागडी बियाणे खरेदी करून केलेल्या पेरण्या व लागवड वाया जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत रूतला आहे.

कापूस, मका, ज्वारी, पपई, ऊस, मिरची, केळी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. कर्ज काढून लागवड व पेरणी केली असून, कर्जाचे पैसे फेडायचे कसे, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. शासनाने दुबार पेरणी ओढवलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच कृषी विभागाने पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही शेतकरी वर्गाकडून होत आहे.