शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाकांक्षी ‘सौभाग्य’ योजनेची लाभाथ्र्याना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 11:10 IST

योजनेला गती द्यावी : शहादा वीज वितरण कंपनीची स्थिती

बोरद : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या ‘हर घर बिजली (सौभाग्य) योजने’ची जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अद्याप प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आह़े योजनेच्या व्याप्तीसाठी अंमलबजावणीची गती वाढविण्यात यावी व याचा लाभ वीज ग्राहकांना मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़ेमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून ‘पंतप्रधान सहज हर घर बिजली योजना’ म्हणजेच सौभाग्य योजना राबविण्यात येत आह़े या माध्यमातून ज्या गाव-पाडय़ांमध्ये अद्याप वीज पोहचली नाही, अशा ठिकाणी युध्द पातळीवर वीज खांब बसविणे, गावा-गावात वीज पोहचवणे आदी कामे वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत आह़े शहादा विभागातील चार तालुक्यांमध्ये या योजनेंतर्गत तब्बल 60 कोटी रुपयांची कामेदेखील हाती घेण्यात आलेली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आह़े परंतु अद्याप याबाबत पाहिजे त्या गतीने कार्यवाही होत नसल्याने वीज जोडणीची कामेही संथ होत असल्याची माहिती समोर येत आह़े शहादा विभागांतर्गत 60 कोटींच्या कामांचा शुभारंभ होऊन 23 हजार 479 घरगुती वीज कनेक्शन देण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून करण्यात येत असल्याची माहिती आह़े या बाबत शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता क़ेडी़ पावरा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, धडगाव तालुक्यात 8 हजार 435, तळोदा तालुक्यात 4 हजार 227, शहादा तालुक्यात 4 हजार 324 तर अक्कलकुवा तालुक्यात 6 हजार 493 ग्राहक असे मिळून 23 हजार 479 ग्राहकांच्या घरगुती वीज जोडणीची कामे प्रगती पथावर आह़ेतारांऐवजी ए़बी़ केबलशहादा विभागांतर्गत चारही तालुक्यांमध्ये वीज जोडणीची कामे करण्यात येत असल्याचा दावा विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात येत आह़े यांतर्गत चारही तालुक्यांमध्ये वीज खांब टाकून त्याव्दारे वीज जोडणीची कामे करण्यात येत आह़े दरम्यान, नवीन वीज खांबावर वीज तारांऐवजी ए़बी़केबलचा वापर करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली़ दरम्यान, अजून सुमारे 15 हजार वीज जोडणीची कामे करायची बाकी  असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ त्यामुळे साहजिकच संपूर्ण जिल्ह्यात योजनेला गती देण्याची आवश्यकता असल्याचे मत वीज ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, ग्रामीण, दुर्गम भागात मोठय़ा प्रमाणात वीज चोरीच्या घटना घडत आहेत़ संपूर्ण गावे आकडीमुक्त करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीकडून घेण्यात आला आह़े परंतु महत्वाकांक्षी योजनांना गती मिळत नसल्याने आकडीमुक्त गावाचे स्वप्न पूर्ण होणार कसे? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े दारिद्रय रेषेखालील कुटुंबियांना वीज जोडणीमध्ये सवलत मिळत आह़े परंतु जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण भागात योजनेची अद्याप सुरुवातदेखील करण्यात आली नसल्याने प्रशासनाने कामाची गती वाढविणे गरजेचे आह़े