शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

स्वेच्छा निवृत्तीमुळे मोलगी एक्सचेंजला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आर्थिक संकटात सापडलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत ६५ कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली. त्यामुळे या विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. सेवेच्या बाबतीत नेहमीच उपेक्षित मोलगी ता. अक्कलकुवा येथील कार्यालयाला थेट कुलूप लागले आहे. परिणामी समस्या दुपटीने वाढल्या आहे.जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे असून या विभागामार्फत मोबाइल ग्राहक, लॅण्डलाईन व ब्रॉडबॅण्ड कनेक्शनही देण्यात आले आहे. या सेवेसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी टॉवर उभारले आहे. त्यात दुर्गम भागातील १२ टॉवरचा समावेश आहे. सरकारी कंपनी म्हणून ओळख असलेली ही कंपनी आर्थिक संकटात सापडली आहे. खर्च कमी करण्यासाठी दूरसंचार विभागाने हजारो कर्मचाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील ६५ कर्मचाºयांना निवृत्ती देण्यात आली आहे.स्वेच्छा निवृत्तीमुळे पगारासाठी होणारा खर्च कमी झाला आहे. परंतु सेवेबाबत मात्र अजूनही प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यात दुर्गम भागातील ग्राहकांना नियमित व सुरळीत सेवा मिळत नव्हती, त्यामुळे त्यांच्याकडून ेसेवेबाबत नेहमीच ओरड होत होती. नियमित कर्मचारी राहत असतानाही सेवा मिळत नसल्याने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. तरीही त्यात अपेक्षेनुसार सुधारणा झाली नाही. असे असतानाच कर्मचारी व अधिकाºयांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली. त्यामुळे दुर्गम भागातील बहुतांश टॉवर बेवारस अवस्थेत पडले आहे. तर मोलगी येथील कार्यालयालाच कुलूप लागले आहे. त्यामुळे दूरसंचारच्या सेवेत येणºया समस्यांमध्ये पुन्हा दुपटीने भर पडली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे, ही बाब टाळण्यासाठी तातडीने सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.सेवा देण्यात नेहमीच दुजाभाव होणाºया मोलगी येथील ग्राहकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असताना केबलही नादुरुस्त झाली. त्यामुळे सद्यस्थितीत खंडीतपणे होणारी सेवाही मिळत नाही. त्यातच स्वेच्छा निवृत्तीही दिली गेल्याने सेवेची वाताहत निर्माण झाली आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी सर्वच त्रुट्या दूर करण्याची मागणी तेथील ग्राहकांकडून होत आहे.धडगाव तालुक्यातही ग्राहकांना मिळते खंडीत सेवा.प्रशासकीय आॅनलाईन कामांमध्ये मोठा अडथळा.बॅँकेच्या कामे वेळेवर होत नसल्याने ग्राहकांच्या नाहक भूर्दंड व वाढल्या फेºया.युवक-युवती अनेक संधींना मुकतात.अंगणवाडी कर्मचाºयांना अहवाल वेळेवर सादर करता येत नाही.खराब झालेले सिमकार्ड पुनर्स्थापित होत नाही.शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत नाही.