विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:43 IST2019-12-11T11:43:39+5:302019-12-11T11:43:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्नाचे अमिष देत शहादा येथील युवतीवर एकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे़ याप्रकरणी ...

Violence against a woman giving her marriage | विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

विवाहाचे अमिष देत युवतीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लग्नाचे अमिष देत शहादा येथील युवतीवर एकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे़ याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करुन पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले आहे़
प्रशांत दिलीपसिंग जोहरी रा़ तळोदा असे संशयित आरोपीचे नाव असून त्याने जानेवारी ते जुलै २०१९ दरम्यान शहादा येथील युवतीसोबत ओळख करुन घेत मोबाईलवर संपर्क सुरु केला होता़ दरम्यान त्याने पिडित युवतीला तळोदा येथील घरी व लोणखेडा येथील लॉजमध्ये घेऊन जात अत्याचार केला होता़ याची वाच्यता केल्यास चुलत भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली होती़
पिडितेच्या कुटूंबियांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने शहादा पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित प्रशांत याच्याविरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला़ संशयितास सोमवारी रात्री उशिरा पोलीसांनी ताब्यात घेतले होते़

Web Title: Violence against a woman giving her marriage