शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

बिलाडी येथे अस्वच्छतेमुळे ग्रामस्थ झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

सारंगखेडा परिसरातील कहाटूळ गावात गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिसाराची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. यातून गावातील अनेकांना बाधा झाली होती. ...

सारंगखेडा परिसरातील कहाटूळ गावात गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिसाराची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. यातून गावातील अनेकांना बाधा झाली होती. यानंतर तालुक्यातील गावांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, आसपासच्या गावांमध्येही सारखीच स्थिती असल्याचे चित्र आहे. बिलाडी येथे ग्रामसेवकाची नियुक्ती करून ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज सुरू आहे. परंतु, संबंधित ग्रामसेवक हे गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावातील बऱ्याच ठिकाणी पाइपलाइन लिकेज व पाण्याच्या टाकीजवळच पाणीपुरवठा करणारे व्हॉल्व्ह लीक असल्याने गटारी तुडुंब भरल्या असल्याचे दिसून येत आहे. यातून गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे ही स्थिती असताना लगतच्या बामखेडा तर्फे सारंगखेडा या गावात कोरोनाचे ४७ रुग्ण आढळूल आले होते. यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. या गावात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना साथीच्या आजारांची भीतीही वाढली आहे.

बिलाडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गावातील गल्लोगल्ली अस्वच्छता असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीस आले आहेत. गावात शुद्ध पाणीपुरवठा घरपोच व्हावा, यासाठी प्रशासनाने सुसज्ज अशी पाण्याची टाकी व दोन बोअरवेल घेण्यात आल्या आहेत. यातून पिण्याचे पाणी साठा करून ठेवणारा जलकुंभ स्वच्छ करण्याबाबत कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. जलशुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरचा साठाही नियमितपणे वापरात आणला जात नाही. जलवाहिन्या पूर्णपणे निकामी झाल्या असल्याने निम्मे गाव हे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहते. एक हजार ५८७ लोकवस्तीचे गाव असलेल्या बिलाडी गावाकडे तालुका प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याठिकाणी नियुक्त ग्रामसेवक हे आठवड्यातून एखाद-दुस-या दिवशी येऊन वेळ मारून नेत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छ भारत मिशन, वित्त आयोगांतर्गत होणारी कामे यांनाही खो दिला जात असल्याचे चित्र सध्या दिसून आले आहे. यात अनेकांना योजनांसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. परंतु, ग्रामसेवकाकडून दाखले मिळत नसल्याने त्यांना शेतीकामे सोडून शहाद्यात जावे लागत आहे.