शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानाच्या पुरस्कारासाठी ग्रामस्थ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्फे गावाला राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले असून, या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्फे गावाला राज्यस्तरीय स्पर्धेत पुरस्कार मिळविण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले असून, या स्पर्धेच्या निकषाविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करणेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील लहान कडवान तालुका नवापूर येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली.लहान कडवान ता.नवापूर या ग्रामपंचायतीला सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत विभागस्तरावर द्वितीय क्रमांक विभागून मिळाला आहे. यामुळे या गावाची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय स्पर्धेत ग्रामपंचायतीला क्रमांक मिळावा, याकरिता राज्यस्तरीय तपासणी समितीकडून ग्रामपंचायती अंतर्गत राबविलेल्या उपक्रमांना कशा प्रकारे गुणांकन केले जाणार आहे? याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा पार पडली.यावेळी डॉ.फडोळ यांनी लहान कडवाण ग्रामपंचायत राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत कोणत्या प्रकारे गुणांकन केले जाते त्यासाठी लोकसहभाग, गावात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता कशी राखता येईल, गाव परिसरात फुलझाडे, वृक्ष संवर्धन, जनावरांच्या मलमूत्राचे व्यवस्थापन कसे करता येईल, सांडपाणी व्यवस्थापानाच्या माध्यमातून डासांचे निर्मूलन कसे करता येईल, घनकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट खत, गांडूळ खत, ओला कचरा व सुका कचरा याचे वर्गिकरण, प्रत्येक घरात शुद्ध व नियमित पिण्याचे पाणी मिळण्यासाठी व पाणी साठवण व हाताळणी याबाबत मार्गदर्शन केले.त्यांनी पुढे बोलतांना शौचालय बांधकाम, त्याचा नियमित वापर याविषयी लोकसहभाग वाढविण्याबाबत ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले. या वेळी सरपंच गोविंद वाऱ्या गावीत, उपसरपंच वंदना सुभाष पाडवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्वच्छ भारत मिशन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील, समाजशास्त्रज्ञ कैलास कांजरेकर, क्षमता बांधणी तज्ञ योगेश कोळपकर, गुलाबसिंग वळवी, मनोहर सूर्यवंशी, अंकुश शिंदे, अश्विन निंबाळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.