शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चढला ज्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने प्रचाराला जोर चढला आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे कर्णकर्कश आवाजात प्रचाराच्या रिक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने प्रचाराला जोर चढला आहे. ध्वनीक्षेपकाद्वारे कर्णकर्कश आवाजात प्रचाराच्या रिक्षा फिरू लागल्या आहेत. ठिकठिकाणी कोपरा सभा आणि कार्यकत्र्याची प्रचार फेरी काढली जात आहे. त्यामुळे आता ख:या अर्थाने निवडणुकीचा ज्वरू चढू लागल्याचे चित्र तयार होत आहे.  कुठलीही निवडणूक असली तर थेट अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होत होते. मतदारांच्या भेटी किंवा ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारा प्रचार नागरिकांना नकोसा होत असतो. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात तीन निवडणुका नागरिकांनी अनुभवल्या. त्यात नगरपालिका, लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली असती तर ती देखील अनुभवली गेली असती. याशिवाय गावोगावच्या ग्रामपंचायती निवडणुका देखील रंगल्या. या प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार अखेर्पयत जनतेला नाकीनऊ आणणारा ठरला होता. आता विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर देखील तोच अनुभव येईल की काय अशी शंका जनतेला असतांना यंदा मात्र, प्रचारात उशीराने रंग भरला गेल्याचे दिसून आले. आता प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाल्याने प्रचाराची रंगत वाढू लागली आहे. जागोजागी उमेदवारांचे होर्ड्ीग दिसू लागले आहेत. काही ठिकाणी एलईडी स्क्रिन असलेली व त्यावर उमेदवार आणि प्रचाराचे वाहने देखील फिरू लागली आहेत. कर्णकर्कश आवाजातील ध्वनीक्षेपक  लावलेल्या रिक्षा देखील फिरू लागल्या आहेत. विद्याथ्र्याच्या सहामाही परीक्षा सुरू असतांनाच आता प्रचाराला जोर आल्याने विद्याथ्र्याच्या अभ्यासावर देखील परिणाम दिसून येऊ लागला आहे. शनिवार सायंकाळर्पयत सार्वजनिक प्रचार करण्याची मुदत असल्याने जास्तीत जास्त मतदारांर्पयत पोहचण्यासाठी प्रत्येक उमेदवार आता आटापीटा करू लागला आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांनी पदाधिकारी आणि घरातील व्यक्तींना विविध भाग वाटून दिले आहेत. जास्तीत जास्त गावांमध्ये आणि मतदारांर्पयत पोहचण्याचा त्यामागे उद्देश आहे.