शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

राहूरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची नंदुरबार कृषी महाविद्यालयास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:01 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी आरामदायी जीवनातून बाहेर येऊन अलौकिक कामाचे ध्येय गाठावे, असे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी आरामदायी जीवनातून बाहेर येऊन अलौकिक कामाचे ध्येय गाठावे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ  राहुरीचे कुलगुरु डॉ.अशोक धवन यांनी कृषी महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी केले.                 यावेळी नंदुरबार येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सात्तापा खरबडे, धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.सी.डी. देवकर उपस्थित होते. महाविद्यालयास आयसीएआर नवी दिल्ली यांच्याकडून रोपवाटिका व्यवस्थापन या प्रकल्पासाठी एकूण ५०.४१ लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून, भेटीचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते शेडनेट हाउस व फळपिकांचे रोपेनिर्मितीसाठी मातृवृक्ष लागवड प्रक्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले.                प्रक्षेत्रावर आवळा, सीताफळ, डाळिंब, पेरू, लिथु, संत्री, चिकू, मोसंबी इत्यादी फळपिकांचे एकूण ५६० मातृवृक्षाची ४.५ हेक्टर क्षेत्रावर रोपेनिर्मितीसाठी लागवड करण्यात आलेली असून, याव्दारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची रोपे उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयातील दोन कोटी लीटर क्षमतेच्या शेततळ्यात पावसाचे पाणी साठवून यामध्ये मत्ससंवर्धनाचे प्रयोग करण्यात येत असून, पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. प्रक्षेत्रावरील एकूण लागवडीलायक क्षेत्रापैकी एकूण १३ एकर क्षेत्र लेझार पाइप व सूक्ष्म सिंचन पद्धतीचा उपयोग फळबाग लागवड करण्यात आलेली आहे.            याप्रसंगी डॉ.खरबडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीविषयक सादरीकरण केले व आवश्यक बाबींसाठी निधीची मागणी केली. सूत्रसंचालन प्रा.राजपूत, तर आभार प्रा.बिराडे यांनी मानले. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात  आला.