शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी ४०० जणांना लस आजपासून लसीकरण ; जिल्ह्यात चार ठिकाणी केंद्रांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी ३ ठिकाण ड्राय रन घेण्यात आला होता.  हा रन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी ३ ठिकाण ड्राय रन घेण्यात आला होता.  हा रन यशस्वी झाल्यानंतर शनिवारपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात हाेणार असून जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरण सुरु होणार आहे. दरम्यान पहिल्या दिवशी ४०० आरोग्य कर्मचा-यांना लस देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.                आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय, म्हसावद ता. शहादा येथील ग्रामीण रुग्णालय आणि अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेतील कर्मचारींचे लसीकरण सुरु होणार आहे. शासनाकडून जिल्ह्यासाठी १२ हजार १४० कोव्हॅक्सीनचे डोस पाठवण्यात आले आहेत. यासाठी एकूण १० हजार ८५७ आरोग्य कर्मचारी, केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे १४, फ्रंटलाईन वर्कर्स १ हजार ९७९ यांची नोंदणी करण्यात आली आहे. या लसीकरणासाठी ४० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दरदिवशी १०० नोंदणी झालेल्या आरोग्य सेवेतील कर्मचा-यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी १८ वर्षावरील लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. या लसीकरण मोहिमेतून दुर्धर आजारी, गरोदर व स्तनदा माता यांना वगळण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.  

त्रास झाल्यास कीट व रुग्णवाहिका तयार   लसीकरणाचा एकीकडे उत्साह असताना लसीकरणानंतर कर्मचा-यांना त्रास जाणवल्यास  जिल्हा रुग्णालयात स्वंतत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक लसीकरण केंद्रावर संभाव्य लसीचा गुंतागुंतीच्या प्राथमिक उपचारासाठी एईएफआय कीट तयार करण्यात आल्या आहेत. या कीटच्या वापराबाबत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.  सर्व लसीकरण केंद्रासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक लसीकरण केंद्रावर एईएफई  झाल्यास त्या लस दिलेल्या कर्मचा-यास तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.