शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बिनविरोधला फाटा, सर्वच ठिकाणी निवडणूक रंगण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 10:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत वगळता एकही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायत वगळता एकही ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊ शकत नसल्याची स्थिती आहे. आता देखील ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीची चुरस वाढली आहे. कोरोना, लॅाकडाऊन, अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेेले आर्थिक संकट यामुळे निवडणुका बिनविरोध कराव्या यासाठी चर्चा असली तरी निवडणुका अटळ असल्याचे चित्र आहे.                 नंदुरबार जिल्ह्यात एकुण ५९५ ग्रामपंचायती आहेत. या पैकी मुदत संपलेल्या व संपणारऱ्या अशा ८७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होऊन प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदाचे वर्ष हे विविध संकटांचे होते. कोरोनाने तर अनेकांचे होत्याचे नव्हते केले. शेतमालाला भाव नाही, अतिवृष्टीने पीके हातची गेली. त्यामुळे गाव पातळीवर आर्थिक संकटाचे वातावरण आहे. परिणामी निवडणूका टाळून सामंजस्याने गावची निवडणूक बिनविरोध करावी अशी अपेक्षा अनेक ठिकाणी आहे. परंतु गाव गाड्याचे राजकारण पहाता, राजकीय पक्षांना आपली दुकानदारी टिकविण्यासाठी आणि आपल्याच गटाच्या, पक्षाच्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायती राहाव्या यासाठी निवडणुका लढविल्या जात आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूक एकाही गावाची होणार नाही हे अगदीच स्पष्ट आहे.  *नंदुरबार जिल्ह्यात कॅांग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांनी  व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. *एकुणच वर्षभरापासून जिल्ह्यात एकही सार्वत्रिक निवडणूक झाली नसल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून असून यावेळी एकही ग्रामपंचायत बिनविरोध होणार नाही हे जवळपास स्पष्टच आहे. 

बिनविरोधची परंपरा असलेले पुरुषोत्तमनगर एकमेव गाव             जिल्ह्यात पुरुषोत्तमनगर ही एकमेव ग्रामपंचायत बनविरोध निवडणूक होणारी आहे. या ठिकाणी सर्वच महिला सदस्यांना निवडून दिले जाते. सरपंच देखील महिलाच असते. त्यामुळे महिला राज असलेली, बिनविरोध होण्याची परंपरा असलेली ही खान्देशातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचेही चित्र आहे. या टप्प्यात ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. 

निवडणूक  ८७

सारंगखेडा    देवमोगरा     भालेर    शनिमांडळ   खोंडामळी   न्याहली    बलदाणे   

    कोपर्ली      डामरखेडा   तोरखेडा      असलोद    बामखेडा  नांदरखेडा   नर्मदानगर

हाटमोहिदा     सिसा        कुंडल       धनराट   धुळीपाडा     उमराण     रायंगण

राजकीय पक्षांना मिळाले बळ             जिल्ह्यात वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक झाली होती. त्यानंतर एकही निवडणूक झाली नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. तब्बल वर्षभर एकही सार्वत्रीक निवडणूक नसल्यामुळे राजकीय पक्षांमध्येही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मरगळ होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही उभारी येणार आहे. या माध्यमातून राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. 

 भाजपचे कार्य जिल्हाभरात मोठे आहे. कार्यकर्ते गावागावात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायती निवडणुका पक्षातर्फे लढविल्या जाणार आहेत. या माध्यमातून पक्षाची ताकत वाढविण्याची संधी आहे. गाव विकासासाठी भाजप सदैव आघाडीवर राहील.                        -विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष, भाजप.

जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकत वाढली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष पुर्ण ताकदिने उतरणार आहे. यासंदर्भात नंदुरबार व शहादा तालुक्यात बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.                   -डॅा.अभिजीत मोरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.

 शिवसेना ग्रामपंचायत निवडणूक लढविणार आहे. परंतु गावाच्या विकासासाठी जेथे आपसातील समजोत्याने निवडणूक बनविरोध होईल तेथे पक्षाची त्यांना साथ असेल. त्यामुळे गावागाड्यात आपसात लढण्यापेक्षा बिनविरोधकडे कल ठेवावा.                          -चंद्रकांत रघुवंशी, नेते, शिवसेना.