शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दुमजली घराला आग संसार झाला बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहराती मंगळबाजारानजीकच्या सिद्धिविनायक चौकातील जुन्या दुमजली घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. फळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहराती मंगळबाजारानजीकच्या सिद्धिविनायक चौकातील जुन्या दुमजली घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. फळ व भाजीपाला विक्रेत्या परिवाराचा संसार        उघड्यावर आला आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या भागात मंगळवार बाजाराची गर्दी असल्याने आग विझविण्यासाठी मोठी कसरत झाली. सिद्धीविनायक चौकात लाकडी इमारतीचे दोनमजली घर आहे. या घरात  फळ व भाजीपाला विक्रेते चेतनसिंह देवीसिंह राजपूत हे परिवारासह भाडेतत्वावर राहतात. आज आठवडे बाजार असल्याने ते सकाळीच आपल्या व्यवसायावर निघून गेले होते. त्यांच्या पत्नी सकाळी बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. घरात त्यांची मुलगी होती. घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील एका युवकाच्या लक्षात आले. आगीने लागलीच रौद्ररूप धारण  केले. नागरिकांनी मिळेल त्या साहित्याने पाण्याच्या वर्षाव आगीवर करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु, आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर येत असल्याने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले.          अग्निशमन बंब आल्यानंतर पालिकेचे कर्मचारी व नागरिकांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आग सुरु असताना काही युवकांनी धाडस करून संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नाही. तोपर्यंत अनेक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होत्या. आगीत सव्वा दोन लाख रुपये, घरातील पंखे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही,अन्नधान्यसह इतर वस्तू बेचिराख झाल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

   फळविक्रेत्याचा संसार आला उघड्यावर...  चेतनसिंह राजपूत शहरातील जुन्या नगरपालिकेच्या चौकात ऋतुमानानुसार फळे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. लहानपणापासूनच अत्यंत मेहनती असलेले चेतन राजपूत यांनी कष्ट करून पै-पैसा जमवून घरात संसारोपयोगी साहित्याची जुळवाजुळव केली. परंतु, घराला अचानक आग लागल्याने सर्वच वस्तू खाक झाल्याने परिवार उघड्यावर आला आहे. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याने चेतनसिंह राजपूत व त्यांच्या पत्नीला यांना रडू कोसळले. आगग्रस्त घराची भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पाहणी केली.  

अग्नीशमन बंबला गर्दीमुळे अडथळे... : आज मंगळवार आठवडे बाजार असल्याने मंगळ बाजारात खरेदी विक्री करणाऱ्यांची गर्दी होती. आग लागल्याचे कळताच पालिकेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. परंतू, बाजारात गर्दी असल्याने अग्निशमन बंबला घटनास्थळी पोहोचण्यासाठी अडथळ्यांच्या सामना करावा लागला.