शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नोटा लांबवणारे दोघे ‘पर्यटक’ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील किराणा दुकानातून नोटांचे बंडल पाहण्यासाठी मागून त्यातून २४ हजार रुपये लंपास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील किराणा दुकानातून नोटांचे बंडल पाहण्यासाठी मागून त्यातून २४ हजार रुपये लंपास करणाऱ्या दोघा परदेशी पर्यटकांना एलसीबी व तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली़ दोघेही इराणचे रहिवासी आहेत़फेरीडोनपौर सईद इस्माईल व मेहबुबीअली जमील रा. इराण अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत़रनाळे येथील भरत चकोर यांच्या किराणा दुकानात मंगळवारी सकाळी १०.३० परदेशी दिसणाºया दोघांनी बनाव करत ४० हजाराचे नोटांचे बंडल पाहण्यासाठी मागितले होते़ दरम्यान त्यातून २४ हजार काढून घेत पळ काढला होता़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र्र पंडीत यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना तपास करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार पथकांनी नंदुरबार, शहादा आणि दोंडाईचा येथून माहिती घेतली होती़ दरम्यान नंदुरबार शहरातील हॉटेलमध्ये दोन विदेशी पुरुष व एक विदेशी महिला वास्तव्य करुन निघून गेल्याची माहिती देण्यात आली़ त्यांचा पेहराव आणि बोलीभाषा ही इराणी लोकांसारखी असल्याचे सांगण्यात आले होते़ दरम्यान दोघे चारचाकी वाहनाने मध्यप्रदेशात रवाना झाल्याची माहिती मिळाली होती़ यानुसार पथकाने खंडवा व देवास तपास सुरु केला होता़ संशयीत आरोपी चारचाकी वाहनाने खंडवा येथून देवासकडे जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक पंडीत यांना पथकांनी दिली होती़ पोलीस अधिक्षक पंडीत यांनी खंडवा आणि देवास येथील पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क करत माहिती दिली होती़ यानुसार मध्य प्रदेश व नंदुरबार पोलीसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी पहाटे दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून १३ हजार रुपये रोख आणि चारचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले़ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस नाईक प्रमोद सोनवणे, राकेश मोरे, मोहन ढमढेरे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे, सपोनि केदार, पोलीस नाईक कृष्णा गुले, ज्ञानेश्वर पाटील यांचे पथकाने केली

२०१० पासुन भारत पर्यटनाच्या बहाण्याने चोऱ्या करत असल्याची कबुली दोघांकडून देण्यात आली़ दोघेही शहरातील मोठ्या हॉटेल्समध्ये मुक्काम करुन त्याच्या आसपास असलेल्या ग्रामीण भागात भेटी देत चोºया करत असल्याचे कबुल केले आहे़ दोघांनी महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरात गुन्हे केल्याची माहिती एलसीबीला मिळाली आहे़ दोघांकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़ या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाचे राज्यासह देशातून कौतूक होत आहे़