शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ तस्करी करणारे दोघे नवापुरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  शहरातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन तस्कर मांडूळ तस्करी करीत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :  शहरातून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील दोन तस्कर मांडूळ तस्करी करीत असल्याची माहिती नवापूर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार नवापूर पोलीसांनी दोन आरोपी, एक मांडूळ प्रजातीचा साप, एक मारुती सुझुकी अल्टो वाहन जप्त केले आहे.नवापूर पोलीसांनी कारवाई न करता वन विभागाकडे सदर दोन्ही आरोपी मांडूळ असा मुद्देमाल देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी दिली. नवापूर वनक्षेत्र,नंदुरबार वन विभाग, येथे वन्यजीव अपराध प्रकरणी ०४ जानेवारी २०२१ रोजी वन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्यातील इतर आरोपी  यांचा तपास सुरू असून आरोपीस नवापूर न्यायालय हजर करण्यात आले.आरोपींना दिनांक ८ जानेवारी २०२१ पर्यंत वन कोठडी सुनावण्यात आली आहे.अक्कलकुआ येथून आज अरमान अब्दुल, मजीत मकराण यांना अटक करण्यात आली आहे.मांडूळ तस्करीचा आंतरराज्य टोळीचा नवापूर पोलीस व वन विभागाने पर्दाफाश केला आहे. काळी जादू, अघोरी विद्या, गुप्त धन शोधण्यासाठी, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी, सट्टा चे आकडे असे विविध प्रकारच्या अंधश्रद्धेने दुर्मीळ मांडून सापाची तस्करी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मांडूळाची किंमत लाखांच्या घरात असते.नवापूर शहर महाराष्ट्र-गुजरात राज्यातील सीमावर्ती भागात असल्याने मांडूळाची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. मांडूळची तस्करी महाराष्ट्र राज्यातील जंगलातून झाली की गुजरात राज्यातील जंगलातून हा संशोधनाचा विषय आहे.वनविभागाने मांडूळ संदर्भात कसून चौकशी करत महाराष्ट्र गुजरात राज्यातील अनेक भागात टिम रवाना करीत संशयित आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. संशयित आरोपी हाती लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. नवापूर वन विभागातील विश्राम गृहात अनेक मंडळीची अधिकाऱ्यांना भेटीगाठी साठी गर्दी दिसून आली.दि.वा. पगार वनसंरक्षक धुळे, सुरेश केवटे उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग, उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, आर बी पवार, वनक्षेत्रपाल नवापुर यांच्या पथकाने केली आहे. मांडूळ तस्करी संदर्भात अजून किती तस्कराची वन विभाग धरपकड करतो याकडे लक्ष लागून आहे.

धागेदोरे गुजरातला...  या मांडूळ तस्करी चे धागेदोरे गुजरात राज्यात गेल्याचे बोलले जात आहे. मांडूळ साप घरात आणल्याने रातोरात मनुष्य करोडपती होतो असे अनेक दशकापासून गैरसमज पसरला गेला आहे. मार्केट मध्ये त्याची मोठी किंमत असल्याने त्यामुळे या मांडूळाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. यासंदर्भात वन विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे. जंगलात गस्त वाढण्याची गरज आहे. मांडूळ साप दोन्ही बाजूला निमुळता असून दुतोंडी सारखा दिसतो त्याचा खाद्य उंदीर असून कोणालाही चावा घेत नाही शांत प्रिय सर्प जातीचा मांडूळ प्राणी आहे.