शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:19 PM

उन्हाळ्याचा परिणाम : ‘ओ पॉङिाटिव्ह’ वगळता सर्वच रक्तगटांचा तुटवडा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : जिल्ह्यातील रक्तसाठय़ात मोठा तुटवडा निर्माण झाला आह़े ‘ओ पॉङिाटिव्ह’ रक्तगट वगळता इतर सर्व गटातील रक्तसाठय़ात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे रक्तदान शिबीरांची संख्या वाढविण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध रक्तगटांचा 24 बॅग इतका रक्तसाठा शिल्लक आहे तर, 29 बॅग रक्तसाठा हा ‘रिझर्व’ ठेवण्यात आला आह़े जिल्ह्यातील अपघातांची स्थिती, गरोदर मातांच्या प्रसुतीची संख्या बघता इतका अत्यंल्प रक्तसाठा असणे चिंताजनक आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठा शिल्लक नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत असत़े उन्हाळ्याचा परिणामउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ उन्हाळ्यात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते तयार होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े उन्हाळ्यात साधारण काळापेक्षा जास्तीची उर्जा खर्ची पडत असत़े तसेच उकाडय़ात घाम निघत असल्याने यातूनही ब:यावेळी थकवा, अशक्तपणा जाणवत असतो़ जीवाची लाही लाही होत असते व त्यातच रक्तदानामुळे अधिकच थकवा येत असल्याचेही अनेक रक्तदात्यांकडून सांगण्यात येत असत़े परिणामी रक्तदान शिबीरेही अत्यंत कमी होत असतात़ त्यामुळे साहजिकच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़इतर जिल्ह्यातून होतेय आयातउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज लागलीच तर, जळगाव, नाशिक तसेच औरंगाबाद येथून रक्तासाठा आयात करण्यात येत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल़े परंतु अचानक एखादा अपघात झाला आणि रक्ताची मोठी मागणी असली तर लगेच रक्तसाठय़ाची व्यवस्था कशी होणार हासुध्दा प्रश्न यातून निर्माण होत आह़े जिल्ह्यातील बहुतेक परिसर हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने या ठिकाणी रक्तदान शिबीर घेणे म्हणजे शिवधनुष पेलण्यासारखे आह़े येथील गरीब आदिवासी बांधवांना प्राथमिक सोयी सुविधाच व्यवस्थित उपलब्ध होत नसतात व त्यात, रक्तदान करणे हे त्यांना जगावेगळे वाटत असत़े त्यामुळे दुर्गम भागातही एखादी रक्तदान शिबीर घेतल्यास या शिबीराला प्रतिसाद मिळेलच असे नसत़े जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने रक्तदान शिबीर, तसेच रक्तदान करण्याबाबतचे जनजागृती कॅम्प घेण्यात येत असतात़ परंतु यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत़े अनेक वेळा, मोलगी, धडगाव आदी दुर्गम भागातही शिबीरांचे आयोजन करण्यात येत असत़े परंतु रक्तदान करण्यामागचे गांभीर्य अद्यापही अनेकांना पटलेले नसल्याने रक्तदान करणा:यांच्या संख्येतही मोठी घट होत असल्याचे दिसून येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच इतर रक्तपेढय़ामध्येही रक्तसाठय़ाचा तुटवडा असल्याचे दिसून आल़े