शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट मशीनच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 11:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बस मध्ये तिकीट काढायच्या ईटीआयएम यंत्रात ‘व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’  बसविण्यात येत असल्यामुळे आणि कनेक्टीव्हिटीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बस मध्ये तिकीट काढायच्या ईटीआयएम यंत्रात ‘व्हेईकल ट्रॅकींग सिस्टीम’  बसविण्यात येत असल्यामुळे आणि कनेक्टीव्हिटीच्या अडचणीमुळे मंगळवारी सकाळपासून यंत्रात व्यत्यय आला. यामुळे वाहकांना मोठय़ा गैरसोयींना सामोरे जावे लागले. यामुळे दिवसभर वेळापत्रक कोलमडल्याने प्रवासी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकांना ईटीआय एम यंत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.  सध्या या यंत्रात जीपीएस सिस्टीम प्रमाणे व्हेईकल ट्रेकिंग सिस्टिम अपलोड केली जात आहे. त्यामुळे मशीनमध्ये काहीसा विस्कळीतपणा देखील आला आहे. याशिवाय वादळ, पाऊस यामुळे इंटरनेट कनेक्टीव्हिटी देखील मिळत नाही. यामुळे मशीन काम करेनासे झाले आहेत. नंदुरबार बस स्थानकात जवळपास 270 ईटीआयएम यंत्रांची सोय उपलब्ध आहे. परंतु मंगळवारी सकाळपासूनच जवळपास 100 पेक्षा अधीक यंत्रांमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. यामुळे मशीन काम करेनासे झाल्याने वाहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. पहाटे पाच वाजेपासून बसचे चालक व वाहक नेहमीप्रमाणे कर्तव्यावर रुजू झाले. परंतु तिकीट काढण्याच्या यंत्रात बिघाड झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर त्यांना स्थानकातून बसेस बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागल्या.यासंदर्भातील समस्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. याची माहिती वरिष्ठांना देऊनही त्याचा उपयोग होत नव्हता. काहीवेळा वाहक व प्रवाशांमध्ये वादाच्या घटना घडल्या. वरिष्ठांनी यासंदर्भात दखल घेतली नसल्यामुळे मंगळवारी मोठय़ा प्रमाणावर समस्येला सामोरे जावे लागले. यंत्र बिघाडाच्या घटनेने स्थानकामधून बस उशिरा धावत असल्याचा प्रकार समोर आला. पहाटेपासूनच बसचे वाहक व चालक नेहमीप्रमाणे कर्तव्याला आले. परंतु, मध्यरात्री तिकीटाच्या यंत्रात बिघाड झाल्यामुळे त्यांनाही मनस्ताप सहन करावा लागला. बस स्थानकाच्या फलाटावर उपस्थित अनेक प्रवाशांनी थेट आगारात जाऊन कर्मचा:यांशी विचारपूस केली. प्रवाशांना त्यांच्या नियोजनानुसार इच्छित स्थळे न जाता आल्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसून आले.     

वाहनांना जीपीएस सिस्टीम लावण्याची सध्या पद्धत आहे. यामुळे संबधीत वाहनाचे लोकेशन मिळते. तशीच सिस्टिम एस.टी.बसमध्ये देखील राहणार आहे. परंतु ती बसऐवजी वाहकाच्या तिकीट यंत्रात राहणार आहे. यामुळे कुठली बस कुठल्या शहरात पोहचली. येण्यास किंवा पोहचण्यास किती वेळ आहे. कुठे एखाद्या घटनेमुळे बस थांबून तर नाही याची माहिती कोड नंबरद्वारे आगारात बसून मिळणार आहे. यामुळे वेळापत्रकात सुसूत्रता येणार आहे.