शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी न थांबणाऱ्या मुख्याध्यापक, अधीक्षकांवर गडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यालयी न राहणाºया आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व अधिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुख्यालयी न राहणाºया आदिवासी आश्रमशाळा मुख्याध्यापक व अधिक्षकांचा प्रोत्साहन भत्ता तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याची कारवाई नंदुरबार प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केली आहे. यात दहा मुख्याध्यापक व पाच अधीक्षकांचा समावेश आहे.नंदुरबार आदिवासी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांना गेल्या महिन्यात अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या. प्रकल्प अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालय अधीक्षक, सहायक लेखाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह इतर अधिकाºयांचा त्यात समावेश होता.या अधिकाºयांनी गणोर ता.शहादा येथील आश्रम शाळेत भेट दिली असता मुख्याध्यापक एम.जी.पाटील हे मुख्यालयी नव्हते. राणीपूर, ता.शहादा आश्रम शाळेत मुख्याध्यापक सी.टी.सोनवणे, चिरखान, ता.शहादा आश्रमशाळेत आर.ओ.बिरारी आणि अधीक्षक सुजित बाविस्कर, चांदसैली, ता.शहादा आश्रम शाळेत मुख्याध्यापक पी.बी.सनेर व मलगाव, ता.शहादा आश्रम शाळेत मुख्याध्यापक टी.बी.गिरासे हे मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट झाले.नवापूर शहरातील आश्रमशाळेत मुख्याध्यापक के.आर.गावीत, धनगराट, ता.नवापूर आश्रमशाळेत मुख्याध्यापक आर.ए.चव्हाण व अधीक्षक पी.एम.पांडे, भादवड, ता.नवापूर आश्रम शाळेत मुख्याध्यापक एन.डी.जाधव व अधीक्षक एस.एस.भांडारकर, नावली, ता.नवापूर आश्रम शाळेत मुख्याध्यापक बी.आर.महाले व अधीक्षक अमोल चव्हाण, आमरसपाडा, ता.नवापूर आश्रम शाळेत मुख्याध्यापक डी.डी.अहिरे तर लोय, ता.नंदुरबार आश्रम शाळेत अधीक्षक ललित साळुंखे हे मुख्यालयी राहत नसल्याचे स्पष्ट झाले.त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला, परंतु तो समाधानकारक नसल्याने प्रकल्प अधिकारी यांनी या कर्मचाºयांचा जानेवारी ते मार्च महिन्याचा प्रोत्साहन भत्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे मुख्यालयी न राहणाºया कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.