शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

पावी व मांदलच्या तालावर रंगले पारंपारिक गेर नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : होळीच्या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी साजरी होणारा डिंडन उत्सवाला सातपुड्याच्या पायथ्याशी सोजडान ता. अक्कलकुवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहिर : होळीच्या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी साजरी होणारा डिंडन उत्सवाला सातपुड्याच्या पायथ्याशी सोजडान ता. अक्कलकुवा येथून सुरुवात झाली आहे. यात पारंपरिक पावी (बासरी) व मांदलच्या ताला-सुरात व्रत पाळणाऱ्या तथा मुलींच्या वेशभूषेतील मुलांनी गेर नृत्य सादर केले.सातपुड्याच्या पायथ्याशी यंदाच्या होलीकोत्सवात थाळी मांदल व पावीच्या सुराच्या तालावर डिंडन गेरनुत्याला सोजडान ता. अक्कलकुवा येथून सुरवात झाली. यासाठी ४१६ नवीन मुलांनी मुलींची वेशभूषा परिधान करीत डिंडन गेरनृत्यात सहभाग नोंदवला. दर दोन वर्षांनी येणाºया या डिंडन उत्सवात दोन राज्यातील नागरिक सहभागी झाले. या उत्सवात नृत्य सादर करणाºया पथकांमधील ४१६ नवीन मुलांनी दि.२७ फेब्रुवारीपासून सराव केला होता. पथकात सर्व मुलेच असले तरी त्यांना मुलींची वेशभूषा करावी लागते. त्यामुळे त्यांना तेथील भाषेत पोयरी म्हणून संबोधले जाते. तर हीच मुले एका दुसऱ्यांदा होणाºया उत्सवात सहभागी झाल्यास त्यांना जुवानी म्हटले जात आहे.डिंडनमधील मुलांना व्रत पाळावे लागते, त्यांना आंघोळ करता येत नाही, पायात चप्पल टाळावे लागतात. भर उन्हातही ब्लँकेट पांघरावे लागते, घरी जाता येत नाही, जोपर्यंत डिंडनचे नियोजित कार्यक्रम पुर्ण होत नाही तोपर्यंत पालनी (व्रत) च्या बंधनात नियमानुसारच राहावे लागते.डिंहन नुत्यात डोक्यावर फेटा बांधून आकर्षित लुगडे कमरेला बांधुन गळ्यात चांदीच्या पारंपारीक दागिने, पायात पायल असे चांदीच्या दागदागीने घालून हे कलाकार सजून हातात डिंडन घेत या डिंडन गेरनृत्यात मांदल व पावीच्या सुरात एका तालावर नुत्य सादर करीत आहे. जुवानी यांनी डोक्यावर फेटा व शर्ट धोतर परिधान करून हातात सतात घेत गेरनृत्यात सहभागी होत आहे. हे डिंडन गेरनृत्य पाहण्यासाठी नृत्य पथकातील पोयºया व जुवानी यांच्या कुटुंबियांसह गुजरात व महाराष्टÑातील नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. ज्या गावात डिंडनचे आयोजन करण्यात आले त्या गावातील ग्रामस्थाकडुन त्याच्या नातेवाईकांना आमत्रंण देत त्यांच्या पाहुणचार करण्यात येत आहे.सकाळपासून या डिंडन गेर नुत्याच्या तयारी करीत दुपारी १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्र्यंत मांदल, थाळी व पावीच्या तालावर नुत्य सादर केले जात आहे. हेच पथके पुन्हा दुसºया गावातील कार्यक्रमासाठी तेथे मुक्कामीच जात आहे. त्यांच्यासाठी त्या-त्या गावातील ग्रामस्थांकडून निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.डिंडनमधील मुलांना व्रत पाळावे लागते, त्यांना आंघोळ करता येत नाही, पायात चप्पल टाळावे लागतात. भर उन्हातही ब्लँकेट पांघरावे लागते, घरी जाता येत नाही, जोपर्यंत डिंडनचे नियोजित कार्यक्रम पुर्ण होत नाही तोपर्यंत पालनी (व्रत) च्या बंधनात नियमानुसारच राहावे लागते.डिंडन नृत्यात डोक्यावर फेटा बांधून आकर्षित लुगडे कमरेला बांधुन गळ्यात चांदीच्या पारंपारीक दागिने, पायात पायल असे चांदीच्या दागदागीने घालून हे कलाकार सजून हातात डिंडन घेत या डिंडन गेर नृत्यात मांदल व पावीच्या सुरात एका तालावर नुत्य सादर करीत आहे.