शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ पर्यटन स्थळ बनतेय हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:28 IST

तोरणमाळ येथे स्थानिक पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे तोरणमाळ हॉटस्पॉट बनू लागले असून, ...

तोरणमाळ येथे स्थानिक पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे तोरणमाळ हॉटस्पॉट बनू लागले असून, ग्रामपंचायतीने आठवडे बाजार बंद ठेवण्यासह शनिवार, रविवार तोरणमाळ बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सुरुवातीला शहरी भागात मर्यादित असलेला हा संसर्ग आता ग्रामीण भागासह थेट दुर्गम- अतिदुर्गम भागातही पोहोचू लागल्याने त्याची भीती आदिवासी भागातही आता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर तोरणमाळ ग्रामपंचायतीने अत्यावश्यक सेवा वगळता आठवडे बाजार बंद ठेवण्यासोबत शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. तोरणमाळ हे निसर्गसौंदर्य स्थळ आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी होत असते. त्यामुळे अतिदुर्गम भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून, एकूण नऊ रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तोरणमाळ ग्रामपंचायत तसेच म्हसावद पोलीस ठाण्यांतर्गत संयुक्त बैठक बोलवून शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनसह आठवडे बाजार बंदचा निर्णय घेण्यात आला. यावेळी तोरणमाळचे सरपंच मधुकर चौधरी, सीमा करणसिंग चौधरी, म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, ग्रामसेवक डी.डी. पाटील, जीवन रावताळे, ग्रामपंचायत सदस्य, तोरणमाळ दूरक्षेत्राचे चंदू साबळे, दिलीप सूर्यवंशी, छोटूलाल पावरा आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

भोगऱ्या उत्सव कोरोनामुळे रद्द

आदिवासी परंपरेनुसार आदिवासी बांधव भोगऱ्या हा उत्सव दिवाळी सणापेक्षा अधिक आनंदाने साजरा करतात. हा सर्वांत मोठा उत्सव मानला जातो. १५ दिवस हा उत्सव आठवडे बाजारात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. भोगऱ्या बाजारानिमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होत असते. आदिवासी तरुणाई मोठ्या जल्लोषाने परंपरा राखत हा उत्सव साजरा करतात. मात्र, यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनानेदेखील गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तोरणमाळ ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार बाजार बंद असल्याने भोगऱ्या, गुलाल्या उत्सव होणार नाहीत, असे तोरणमाळचे सरपंच मधुकर चौधरी यांनी सांगितले.