शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात ‘द बर्निंग बस’ चा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST

कोठार : तळोद्याहून शहादाकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील हरकलाल नगर ...

कोठार : तळोद्याहून शहादाकडे जाणाऱ्या बसने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील हरकलाल नगर जवळीस पेट्रोल पंपासमोर घडली. वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या सर्व प्रकारामुळे ‘द बर्निंग बस’चा थरार अनुभवायला मिळाला.

याबाबत असे की, अक्कलकुवा आगारातून बस क्रमांक एमएच १४- बीटी १७२० ही तळोदामार्गे शहादा येथे जात होती. बुधावारी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास अवघ्या अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी अंतरापर्यत ही बस गेली असता बसचा प्रेशर पाईप फुटला. त्यामुळे जोराचा आवाज झाला व बसच्या खालच्या बाजूने धूर निघू लागला. आवाज झाल्याचे लक्षात आल्यानंतर थोडे अंतर पुढे जाऊन चालक व वाहकाने बस साईडला उभी करे पावेतो धूर निघणाऱ्या भागात बसने पेट घेतला.

यावेळी बसमध्ये ३० ते ३५ प्रवासी होते. बसच्या खालून धूर व आग लागल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत बसमधून प्रवाशांना तात्काळ खाली उतरविण्यासाठी मदत केली. प्रसंगावधान राखत पेट्रोल पंपावरील अग्निशमन उपकरणाने तात्काळ आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

या सर्व प्रकारामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात घाबरले होते. प्रवास्यामध्ये लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुणांचा समावेश होता. बसला आग लागल्याचे पाहून बघ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली तर काहींनी मदतीसाठी धाव घेत प्रवाश्यांना खिडकीतून बाहेर काढले तर काहींनी आग विझविण्यासाठी मदत केली.

लखनच्या हिमतीचे कौतुक

बसला आग लागण्याचे पाहून हरकलाल नगर जवळ असणाऱ्या पेट्रोल पंपवर काम करणारा लखन शिवदास वळवी (३०) या तरूणांने हिम्मत दाखवत पेट्रोल पंपावर असलेले अग्निशमन यंत्र घेत बस खाली घुसला व त्याने ती आग विझवली. सुमारे पाच ते आठ मिनिटे ही आग धगधगत होती. परंतु लखनने हिंमत दाखवून ही आग विझविल्याने अनेक प्रवाशांचे जीव वाचले व मोठं नुकसान टाळता आले. लखनने दाखवलेल्या या हिमतीचे प्रवासी व उपस्थितांकडून कौतुक करण्यात येत होते.

बसेसचे फायर ऑडिट व फायर सुरक्षितता ऐरणीवर

या प्रकारामुळे बसेसचे फायर ऑडिट व अग्निशमन सुरक्षिततेचा विषय ऐरणीवर आला आहे. बसला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंपावरील अग्निशमन यंत्राच्या मदतीने बसची आग विझवण्यात आली. बसमध्ये अग्निशमन यंत्र होते,परंतु ते फारसे छोट्या स्वरूपातले होते. आगीचे स्वरूप पाहता ते यंत्र निकामी होते. पेट्रोल पंपासमोर बस उभी राहिल्याने आग विझविण्यासाठी पेट्रोल पंपावरील अग्निशमन यंत्र तात्काळ आग विझविण्यासाठी उपलब्ध करता आले. मात्र रस्त्यावर जर इतरत्र बसला अशाप्रकारे आग लागली असती तर बसमधील अग्निशमन यंत्र उपयोगात आले नसते. या सर्व प्रकारामुळे बसच्या फायनल ऑडिटच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अक्कलकुवापासून तळोदा पर्यत बस व्यवस्थित आली. परंतु तळोदा बसस्थानकातून शहादाकडे मार्गस्थ झाल्यानंतर बसच्या खालून आवाज आला. बस पंचर झाल्याचे वाटले परंतु काही क्षणात बसने खालून पेट घेतल्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. -जी.के. पवार, वाहक

मी बसमध्ये बसलो होतो. अचानकपणे मोठा आवाज झाला व काही वेळानंतर चपलांखाली गरम लागत असल्याची जाणिव झाली. तेवढ्यात बसच्या खालील भागाला आग लागल्याची चर्चा ऐकायला आली व आम्ही घाबरून घाईघाईने बस खाली उतरतो. - शुभम मराठे, प्रवासी