शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड तांड्यावर आढळले २८ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांसोबत त्यांचे पाल्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऊसतोड कामासाठी समशेरपूर ता.नंदुरबार भागात आलेल्या कन्नड, चाळीसगाव व मालेगाव येथील कामगारांसोबत त्यांचे पाल्य तथा शालेय विद्यार्थी देखील आले आहेत. ही बाब शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात आढळून आले आहे.समशेरपूर येथील अ‍ॅस्ट्रोरिया साखर कारखानाच्या ऊस कार्यक्षेत्रात बहुसंख्य शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. त्यात शिंदे, कोरीट, प्रकाशा यासह अन्य गावांचा देखील समावेश आहे. हा ऊसतोडणी कामासाठी चाळीसगाव, धुळे, कन्नड, साक्री व मालेगाव भागातील ऊसतोड मजूर समशेरपूर साखर कारखाना परिसरात दाखल झाले आहे. या कामगारांसोबत त्यांचे पाल्य परंतु शालेय शिक्षण घेणारी मुले देखील आली आहेत. समशेरपूर कारखान्याजवळील ऊसतोड मजूरांच्या तांड्यावर पौढ व्यक्तींसह काही सहा ते १४ वर्ष वयोगटातील मुलेही दिसून येत होते. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य अथवा शालेय शिक्षण घेणारे असू शकतात, अशी शंका काही घटकांमधून उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत सर्व्हेक्षण करण्यात आले.या सर्व्हेक्षणात एकुण २८ असून ही मुले असल्याचे आढळून आले असून ते सर्व शालेय स्तरावरील शिक्षण घेणारे असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. शिक्षण विभागामार्फत या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून त्यांना समशेरपूर येथील शाळांमध्ये शिक्षणासाठी दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली परंतु तांड्यापासून समशेरपूरची लांब असल्यामुळे हे मुले शाळेत येणार नाही. ही बाब देखील शिक्षण विभागाने विचारात घेतली.समशेरपूर शिवाय कोरीट ता.नंदुरबार येथेही उसतोड कामगार दाखल झाले असून त्यांच्या सोबतही काही शाळकरी विद्यार्थी आले असावे, असा अंदाज शिक्षण विभागामार्फत वर्तविण्यात आला. त्यानुसार तेथील तांड्यावरही सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सरशेरपूरच्या ऊसतोड वसाहतीप्रमाणे अन्य ऊसतोड कामगारांच्या वसाहतींवर देखील असे विद्यार्थी आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ऊसतोड वसाहतींमध्ये जाऊन सर्व्हे करणे अपेक्षित असल्याचे काही जाणकार घटकांमधून सांगण्यात येत आहे.