शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

तळोद्यात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 3:49 PM

तळोदा : बंद घरांना कुलूप लावल्याची संधी साधत चोरटय़ांनी रविवारी मध्यरात्रीनंतर तब्बल तीन घरे फोडलीत. ही घटना शहरातील मध्यवर्ती ...

तळोदा : बंद घरांना कुलूप लावल्याची संधी साधत चोरटय़ांनी रविवारी मध्यरात्रीनंतर तब्बल तीन घरे फोडलीत. ही घटना शहरातील मध्यवर्ती वस्तीत घडल्याने शहरवासीयांमध्ये प्रचंड भिती पसरली आहे. या चोरीत चोरटय़ांचा हाती जास्त मुद्देमाल लागला नसला तरी चोरीच्या तीन घटना घडल्यामुळे चोरटय़ांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हानच दिले आहे. दरम्यान एका घरात चोरी करतांना हे तीघे चोरटे घरमालकाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्यांनी रूमालाने आपला चेहरापूर्णपणे गुंडाळलेला होता. साधारण 18 ते 28 वयोगटातील हे चोरटे असल्याचे म्हटले जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार दिलीप शहा, अरविंदलाल विठ्ठलदास वाणी व सुरेश वाणी हे तिघे घरमालक बाहेर गावी गेल्याने त्यांच्या घराच्या पुढील दरवाजास कुलूप लावले होते. ते रायपूर जवळील चंपारण्य येथे देवदर्शनासाठी गेले आहे. तर अरविंद वाणी उपचारासाठी गुजरात मधील वापी येथे गेले आहेत. तिसरे मालक नोकरीनिमित्त बाहेर गावी आहेत. साहजिकच त्यांच्या घरांना कुलूप लावले होते. चोरटय़ांनी नेमकी हीच संधी साधून सुरूवातीला दिलीप शहा यांचे घराचे कुलूप टामीने तोडले. त्यानंतर आत प्रवेश करून घरातील तिजोरी फोडली. त्यातील सहा-सात हजार रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिणे लांबविले. विशेष म्हणजे कपाटातील चिल्लर घेवून न जाता तिथेच बेडवर टाकून पसार झाले. त्यानंतर त्याननी आपला मोर्चा वाणी गल्लीतीलच अरविंद वाणी यांच्या घराकडे वळवित घर फोडले. तेथे कपाट फोडले शिवाय देवाच्या देवारादेखील फोडला आहे. त्यातील सामान अस्ताव्यस्त केला आहे. घरमालक अजून र्पयत आले नसल्यामुळे किती रक्क़म व दागिने चोरले याबाबत तपशील कळू शकला नाही. त्याचबरोबर या चोरटय़ांनी तेथूनच जवळ असलेल्या सुरेश वाणी यांच्या घराला लक्ष केले होते. तेथेदेखील चोरटय़ांनी कपाट फोडून सामान अस्ताव्यस्त केला आहे. मात्र तेही बाहेर गावी असल्याने तेथून किती डल्ला मारला याची माहिती मिळू शकली नाही. तिघांच्या घरांचे दरवाजे उघडे दिसून आल्यामुळे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधीत घरमालकांशी मोबाईलने संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळविल्यामुळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. संबंधीत चोरटे दिलीप शहा यांचा डॉक्टर असलेल्या मुलाने आपल्या दवाखान्यात सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. त्या कॅमेरात कैद झाले आहेत. हे तिन्ही चोरटे 18 ते 20 वयोगटातील आहे. त्यांनी आपला संपूर्ण चेहरा रूमालाने गुंडाळलेला होता. ते तिघे मोटारसायकलवर तीन सीट आले असल्याचे कॅमे:यात दिसून येत आहे. शहरातील मध्यवस्तीतील तब्बल तीन घरे फोडण्यात चोरटे यशस्वी झाल्यामुळे साहजिकच शहरवासियांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरार्पयत गुन्हा दाखल झालेला नव्हता. घर मालक पोहोचले नसल्याचे सांगण्यात आले होते.