लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमधून येणारा गुटखा व तंबाखूचे पदार्थ एलसीबीने धाड टाकून जप्त केले. सव्वा तीन लाखाचा गुटखा व वाहन असा एकुण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.रवींद्र तुळशीराम पाटील, भरत हिलाल बडगुजर, देविदास चौधरी रा.शिंदखेडा व होलाराम सिंधी रा.नंदुरबार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना गुजरातमधून गुटखा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी १८ जून रोजी सकाळपासून पथराई फाट्यावर पाळत ठेवली होती. दुपारी साडेबारा वाजता जीपगाडी (क्रमांक एमएच ०६ एबी ८६२७) आली असता अडवून तपासणी केली. त्यात २ लाख ७२ हजाराचा विमल गुटखा व ४८ हजाराचे तंबाखूचे पदार्थ आढळले. वाहनासह मुद्देमाल जप्त केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}