शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शांतीवनात एकाच रात्रीत तीन घरे फुटल्याने ‘अशांती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शिरुड रस्त्यावरील शांतीवन नगरातील कुटूंबाला खोलीत कोंडून तिघा चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शिरुड रस्त्यावरील शांतीवन नगरातील कुटूंबाला खोलीत कोंडून तिघा चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे घडली़ घटनेमुळे खळबळ उडाली असून येथील रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे़शहादा ते शिरुड रस्त्यावर शांतीवन नगर ही नवीन वसाहत आहे़ याठिकाणी उत्तम भिमसिंग पाटील यांच्यासह त्यांचे भाडेकरु विठ्ठल पाटील हे राहतात़ रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी उत्तम पाटील यांच्या घरात प्रवेश करुन घरातील इतर खोल्यांना कडी लावत कपाट असलेल्या खोलीत प्रवेश करत चोरी केली होती़ चोरट्यांनी कपाट फोडून १ लाख ८१ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केला़ उत्तम पाटील यांच्या घरात चोरी केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे भाडेकरु अनिल पाटील यांच्या घराकडे मोर्चा वळवला होता़ अनिल पाटील हे बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घराला कुलूप होते़ चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील सुमारे ५७ हजार रुपयांचे दागिने आणि दागिने व रोख रक्कम चोरी करुन नेले़ चोरट्यांनी येथून पळ काढत भिमसिंग विजयसिंग गिरोस यांचे बंद घर फोडून तेथूनही २८ हजार रुपये रोख लांबवले़ एकाच रात्री तीन घरे फुटल्याची माहिती रविवारी सकाळी समोर आल्यानंतर पोलीसांसह परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते़ चोरटे चोरी करुन सहजपणे या भागातून पसार झाल्याची माहिती समोर आली असून रविवारी ठसे तज्ञ, श्वानपथकाला बोलावून तपासणी करण्यात आली होती़ परंतू अपेक्षित यश मिळालेले नसल्याची माहिती आहे़४अनिल पाटील व भिमसिंग गिरासे या दोघांच्या घरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता़ तर उत्तम पाटील यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोर आत आले होते़ चोरट्यांचा आवाज आल्यानंतर उत्तम पाटील यांनी खोलीच्या दरवाजाकडे धाव घेतली असता बाहेरुन कडी लावल्याने त्यांना बाहेर पडता आले नव्हते़ त्यांनी पत्नी आणि मुलांना उठवल्यानंतर आरडाओरड सुरु केली होती़ दरम्यान तीन ते चार जण पळून जाताना त्यांना दिसून आले़ यापूर्वीही शांतीवन परिसरात चोरीच्या घटना घडल्या आहेत़ दोन ते तीन ठिकाणी घरफोडी केल्यानंतर चोरटे पुन्हा या भागात सक्रीय झाल्याने चिंता वाढल्या आहेत़ विशेष म्हणजे पोलीसांकडून या भागात सातत्याने गस्त सुरु आहे़शांतीवन नगर हे शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे़ शुकशुकाट असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी येथे घरफोडी केल्याचा अंदाज आहे़ नागरिकांकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत बैठका झाल्या आहेत़ सीसीटीव्हीमुळे चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे़शहादा शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत़ खास करुन दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत़ पोलीस प्रशासनाकडून केवळ गस्तीची कारवाई होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे़