मंदाणे येथे दोन दिवसांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST2021-04-02T04:31:58+5:302021-04-02T04:31:58+5:30

मंदाणे गावात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांबरोबर मृत्यू संख्याही वाढत असल्याने गावात चिंतेचे सावट पसरले आहे. आतापर्यंत गावातील व बाहेरगावी ...

Three died in two days at Mandane | मंदाणे येथे दोन दिवसांत तिघांचा मृत्यू

मंदाणे येथे दोन दिवसांत तिघांचा मृत्यू

मंदाणे गावात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांबरोबर मृत्यू संख्याही वाढत असल्याने गावात चिंतेचे सावट पसरले आहे. आतापर्यंत गावातील व बाहेरगावी मिळून मृत्यूसंख्या १५ वर पोहोचली आहे, तर बाधितांची संख्या ५० च्या पुढे आहे. ग्रामपंचायतीतर्फे संपूर्ण गावात फवारणी करण्यात येत असून, स्वॅब घेण्यासाठी व लसीकरण करून घेण्यासाठी वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एक वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गावातील सर्व व्यवहार, दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्यात आले आहे. स्वॅब घेण्यासाठी नावे नोंदणीचे काम ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात येत आहे. ३१ मार्च रोजी प्राथमिक शिक्षकाचा, तर १ एप्रिल रोजी ७० वर्षीय शेतकरी व ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण मोहीम ठेवण्यात आलेली आहे. नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

Web Title: Three died in two days at Mandane