नंदुरबारातून एकाच रात्री तीन दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:46 AM2017-12-21T11:46:04+5:302017-12-21T11:46:20+5:30

Three Bike Lampas from Nandurbar | नंदुरबारातून एकाच रात्री तीन दुचाकी लंपास

नंदुरबारातून एकाच रात्री तीन दुचाकी लंपास

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील देवकीनगर भागातून एकाच रात्री तीन मोटरसायकली लंपास झाल्याची घटना 17 रोजी घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी लंपास होण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन महिन्यांपूर्वीच पोलिसांनी दुचाकी चोरणा:या आंतरराज्य टोळीला पकडले होते. त्यांच्याकडून 25 पेक्षा अधीक मोटरसायकली जप्त केल्या होत्या. आता पुन्हा मोटरसायकली चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील देवकीनगर भागातून एकाच रात्री तीन मोटरसायकली चोरीस गेल्या. या भागातील प्लॉट नंबर 32 मधून दिनेश प्रल्हाद शिरसाठ यांची (एमएच 20 सीएन 1204), संदीप दामोदर पाटील यांची (क्रमांक एमएच 39-के 7302) व प्रल्हाद जगन्नाथ घुले यांची (एमएच 39-टी 5145) क्रमांकाची मोटरसायकल चोरटय़ांनी चोरून नेली.  मोटरसायकलींचा ठिकठिकाणी शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने दिनेश शिरसाठ यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला. तपास फौजदार पी.पी.सोनवणे करीत आहे.    

Web Title: Three Bike Lampas from Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.