व्हॉल्वच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 12:17 IST2020-06-16T12:17:51+5:302020-06-16T12:17:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेने पावसाळ्यापूर्वी पाईपलाईनची गळती शोधून दुरूस्त केले असली तरी व्हॉल्वच्या गळती बंद केल्या गेल्या ...

Thousands of liters of water are wasted due to leakage of valve | व्हॉल्वच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

व्हॉल्वच्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पालिकेने पावसाळ्यापूर्वी पाईपलाईनची गळती शोधून दुरूस्त केले असली तरी व्हॉल्वच्या गळती बंद केल्या गेल्या नसल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे.
नंदुरबार शहराला झराळी पंपींग स्टेशन व आष्टे येथून पाणी पुरवठा होतो. या दरम्यान असलेल्या पाईपलाईनचे लिकेज पावसाळ्यापूर्वी शोधून ते दुरूस्त करण्यात आले आहेत. पावसाळ्यात पाण्याची समस्या नको म्हणून पालिकेने पूर्वीच नियोजन करून ठेवले आहे. हे करीत असतांना मात्र पाईपलाईनच्या व्हॉल्वची दुरूस्ती केली गेली नसल्याचे चित्र आहे. आष्टे येथून येणाऱ्या पाईपलाईनला जिल्हा ुरुग्णालय तसेच इतर ठिकाणच्या व्हॉल्वला तसेच नवापूर चौफुली ते साक्री नाका दरम्यान पांझरापोळ समोरील व्हॉल्वला गळती लागलेली आहे.
या ठिकाणाहून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या ठिकाणाहून येथे असलेल्या वस्तीतील कुटूंब पाणी भरण्यासाठी येथे गर्दी करीत असतात. वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी पालिकेने या ठिकाणी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Thousands of liters of water are wasted due to leakage of valve