शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘तिसरा डोळा’ पुन्हा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज सद्यस्थितीत पाण्याने तुडूंब भरला आहे. मात्र बॅरेजच्या सुरक्षेसाठी असलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज सद्यस्थितीत पाण्याने तुडूंब भरला आहे. मात्र बॅरेजच्या सुरक्षेसाठी असलेले सीसीटीव्ही कमॅरे बंद असून दोन महिन्यांपासून सुरक्षा रक्षकही नसल्याने हा बॅरेज पुन्हा रामभरोसे झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील बॅरेज पाण्याने १०० टक्के भरला आहे. बॅरेजला धोका पोहोचू नये, परिरसरात चोरी होऊ नये व कायमस्वरुपी निगराणी रहावी यासाठी शासनाने सात ते आठ लाख रुपये खर्च करून येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसिवले आहेत. त्यात दोन जम्बो तर चार लहान कॅमेरे आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेसाठी कंट्रोल रुम व त्याठिकाणी एलसीडी ठेवण्यात आलेला आहे. मात्र आजच्या स्थितीला सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. तेथील एलसीडी देखील सुरू झालाच नाही. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या या बॅरेजवर काही दुर्घटना घडली किंवा साहित्याची चोरी झाली तर लाखो रुपये खर्च करून बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा काय उपयोग? असा प्रश्न पडतो. बॅरेजवर भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत चौकशी करून हे कॅमेरे का बंद राहतात याचा शोध घेणे गरजेचे आहे. सध्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी आलेली असून सीसीटीव्हीचे फुटेज अर्ध्या रात्री  घरीबसल्या संबंधित अधिकारीही पाहू शकतात. एवढी सुविधा असता ती येथे कार्यान्वित का होत नाही. 
या बॅरेजवर मार्च २०२० पासून सुरक्षा रक्षक नेमले होते. तीन शिफ्टमध्ये चार सुरक्षा रक्षक होते. सहा महिने त्यांनी काम केले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा १९ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंत काम केल्याचा पगारच झालाच नाही.  म्हणून विभागीय कार्यालय धुळे    यांनी पत्र देऊन त्यांना ३१ ऑगस्टपासून बंद केले आहे. म्हणून सप्टेंबरपासून याठिकाणी सुरक्षा रक्षकही नसल्याने बॅरेजची स्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झाली आहे. मार्चपासून या सुरक्षा रक्षकांना पगार नसल्याने त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. निदान जेवढे दिवस काम केले आहे त्या दिवसांचा तरी पगार द्यावा, अशी मागणी या सुरक्षा रक्षकांनी बॅरेजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.