शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई पुलावर पाण्याचा निचरा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान असलेल्या गोमाई नदी पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच राहिली ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान असलेल्या गोमाई नदी पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागाच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुंना सुमारे दोन ते तीन इंच एवढा मातीचा थर जमला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी निचरा होण्याकरीता जागा शिल्लक नसल्याने पावसाळ्यात या पुलावर धोका निर्माण होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा या गावांना जोडणारा डामरखेड्या जवळ गोमाई नदीवर पूल असून, सद्य:स्थितीत या पुलाची दयनिय अवस्था झाली आहे. तसेच पुलाच्या संरक्षण कठड्यांना तडे गेले असून, काही ठिकाणी सिमेंट निघाले आहे. तसेच इतर ठिकाणी लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत.दरम्यान, या पुलाच्या जॉईनच्या ठिकाणी मोठी खाच पडली असून, पुलावर ठिकाणी लहान मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून अवजड वाहन गेल्यास पुलाला हादरा बसतो. त्यामुळे पुलाचे आयुष्यदेखील कमी होत असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाच्या दुरूस्तीसाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.एवढेच नव्हे तर आता पावसाळा सुरू होत असून, या पुलावर पावसाचे पाणी साचल्यास चिखलाचे साम्राज्य तयार होईल. त्यामुळे या मार्गावरून वाहन काढतांना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागते. तसेच पुलाचे आयुष्यही कमी होईल. त्यामुळे संबंधितांनी या पुलावरील मातीचा थर काढल्यास पावसाळ्यात पाणी साचणार नाही, अशी अपेक्षा वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या पुलावरील अपघातास कारणी भूत ठरू पाहणाऱ्या खड्ड्यांवर डांबरीकरण करून वाहनधारकांना सोयीचे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.