शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

शहादा व अक्कलकुवा येथे चोरीचे सत्र, दोन ठिकाणी चोरी, चार ठिकाण प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. अक्कलकुवा व शहाद्यात घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास झाला आहे. तर ...

नंदुरबार : जिल्ह्यात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. अक्कलकुवा व शहाद्यात घरफोडीत हजारोंचा ऐवज लंपास झाला आहे. तर शहाद्यात चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी राहत असल्याने या मोठ्या कालावधीत चोरटे आपला हेतू साध्य करीत असल्याचे चित्र आहे.

अक्कलकुवा येथे शिवनेरी चौकातील ओमशांती मोबाईल दुकानातून चोरट्यांनी ११ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुकानाचे शटर उचकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तीन मोबाईल, दहा चार्जर एक एअरफोन असा एकुण ११ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत कुलदीप मदनलाल टाक यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार सुरेश चौधरी करीत आहे.

६६ हजाराचा ऐवज लंपास

दुसरी घटना शहादा येथे घडली. शहरातील दशरथ नगरातील साहेबराव दौलत कोळी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी चोरीची ही घटना लक्षात आली. याबाबत साहेबराव कोळी यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेलाचे बॅरेल लंपास

शहादा शहरातीलच नवीन भाजीपाला मार्केट या भागातील किराणा दुकानात बाहेर ठेवण्यात आलेले सोयाबीन तेलाचे दोन बॅरल चोरट्यांनी चोरून नेेले.

प्रत्येक बॅरल मध्ये १८० किलो तेल होते. त्यांची किंमत ६० हजार रुपये आहे. यापूर्वीदेखील शहरात तेलाचे बॅरेल चोरीला गेले आहेत.

चार ठिकाणी प्रयत्न

याच सोबत शहरातील सरदार वल्लभभाई पटेल मार्केट मनोरंजन चित्रमंदिर जो लागून असलेल्या धनराज अँड कंपनी या होलसेल किराणा दुकानातून दहाचा रुपयाच्या नोटा तसेच एक व दोन रुपयांची चिल्लरची नाणी, एक भ्रमणध्वनी हँडसेट चोरांनी चोरून दिलेला आहे. या दुकानासमोरील मनोहर साडी दुकानाचे सेंट्रल लॉक तोडून आत मध्ये चोरी करण्याच्या प्रयत्न केलेला आहे.

याच दुकानाला लागून असलेल्या मंजूर टेलर या ट्रेनिंग व्यवसायाच्या दुकानातून शिवणकाम करण्यासाठी आलेले कपडे चोरीला गेलेले आहेत. एकाच दिवशी चार ते पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.